काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना Z+ सुरक्षा, गृह मंत्रालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 06:07 PM2024-02-22T18:07:48+5:302024-02-22T18:09:44+5:30

Mallikarjun Kharge: मल्लुकार्जुन खरगे यांना 58 कमांडो चोवीस तास सुरक्षा पुरवतील.

Mallikarjun Kharge Security: Congress president Mallikarjun Kharge gets Z+ security, Ministry of Home Affairs orders | काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना Z+ सुरक्षा, गृह मंत्रालयाचे आदेश

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना Z+ सुरक्षा, गृह मंत्रालयाचे आदेश

Mallikarjun Kharge Z+ Security: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गृह मंत्रालयान खरगेंना Z+ प्लस सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. आयबीच्या थ्रेड पर्सेप्शन रिपोर्टच्या आधारे काँग्रेस अध्यक्षांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खरगे यांना मिळालेल्या झेड प्लस श्रेणीच्या सुरक्षेत सीआरपीएफचे एकूण 58 कमांडो 24 तास सुरक्षा पुरवतील. विशेष म्हणजे, काँग्रेस अध्यक्षांना मिळालेल्यी झेड प्लस श्रेणीची सुरक्षा देशभरात असेल. म्हणजेच, खरगे देशातील कुठल्याही राज्यात गेले तरीदेखील त्यांना ही सुरक्षा पुरवली जाईल.

Z Plus सुरक्षा म्हणजे काय?
झेड प्लस सुरक्षेमध्ये सामान्यतः 55 कर्मचारी असतात, ज्यात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक कमांडो आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्व आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असतात. यातील प्रत्येक सदस्य मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कौशल्यांमध्ये तज्ञ असतो. देशातील सुमारे 40 व्हीआयपींना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

Web Title: Mallikarjun Kharge Security: Congress president Mallikarjun Kharge gets Z+ security, Ministry of Home Affairs orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.