शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मक्कल नीथी मय्यम... कमल हासन यांच्या नव्या पक्षाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 20:42 IST

तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका सिनेकलाकराचे आगमन झाले आहे. अभिनेता रजनीकांत यांच्यानंतर कमल हासन यांनी राजकरणात एन्ट्री केली असून त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाचे नाव 'मक्कल नीथी मय्यम' असे जाहीर केले असून पक्षाचे चिन्ह आणि झेंड्याचेही अनावरण करण्यात आले.  

मदुराई : तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका सिनेकलाकराचे आगमन झाले आहे. अभिनेते रजनीकांत यांच्यानंतर कमल हासन यांनी राजकरणात एन्ट्री केली असून त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाचे नाव 'मक्कल नीथी मय्यम' असे जाहीर केले असून पक्षाचे चिन्ह आणि झेंड्याचेही अनावरण करण्यात आले.  मदुराईमध्ये कमल हासन यांनी बुधवारी पक्ष स्थापनेसाठी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी नवीन पक्षाची घोषणा केली. या सभेदरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काही राजकीय नेते आणि कमल हासन यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली. पक्षाचे नाव घोषित करताना कमल हासन म्हणाले की, मक्कल नीथी मय्यम' पार्टी तुमची आहे. ही पार्टी लोकांसाठी आहे. मी फक्त तुमचा टूल आहे, तुमचा नेता नाही. मी तुमच्याकडून राजकीय सल्ल्याची मागणी करत आहे. 

दरम्यान, राजकारणात प्रवेश करण्याआधी कमल हासन आज सकाळी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरमस्थित घरी गेले आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसंच मच्छिमारांनाही संबोधित केले. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी ज्या शाळेतून शिक्षण घेतले त्या शाळेमध्येही कमल हासन जाणार होते. पण नंतर त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाला. यावेळी माध्यमांशी बोलताना कमल हासन म्हणाले, महानता साधारण घरातून येते हे घर त्यापैकी एक आहे. यामुळे मी प्रभावित झालो आहे. अब्दुल कलाम यांच्या घरी भेट दिल्यानंतर कमल हासन यांनी रामेस्वरममध्ये मच्छिमारांशी संवाद साधला होता. दुसरीकडे, कमल हासन यांच्या पक्षाच्या घोषणेआधीच राज्यात राजकीय वातावरणात तापल्याचे दिसून आले. डीएमकेचे वरीष्ठ नेते एमके स्टॅलिन यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिले. राजकारणात कागदाच्या फुलांमधून कधीही सुगंध येत नाही, असे त्यांनी पत्रात लिहिले. 

टॅग्स :Kamal Hassanकमल हासन