परालीपासून तयार होऊ शकतो सीएनजी - अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 11:28 AM2019-11-07T11:28:41+5:302019-11-07T11:32:15+5:30

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या परालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली.

making commercially suitable cng from parali | परालीपासून तयार होऊ शकतो सीएनजी - अरविंद केजरीवाल

परालीपासून तयार होऊ शकतो सीएनजी - अरविंद केजरीवाल

Next
ठळक मुद्देपरालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली. शेजारी राज्यांनी पुढे येऊन विचार करावा असं आवाहनही केजरीवाल यांनी केलं.तयार होणाऱ्या सीएनजीचा आसपासच्या गावांमधील ट्रॅक्टरमध्ये वापर होऊ शकतो.

नवी दिल्ली - दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या परालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली आहे. हा प्रयोग तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या सहज शक्य आहे असंही ते म्हणाले आहेत. त्यासाठी शेजारी राज्यांनी पुढे येऊन विचार करावा असं आवाहनही केजरीवाल यांनी केलं आहे. 

'हा प्रयोग केला तर यातून रोजगार उत्पन्न होईल व शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्नही मिळेल. त्यासोबतच दरवर्षीची प्रदूषणाची समस्याही मार्गी लागेल. मात्र त्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल' असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. परालीपासून सीएनजी तयार करण्यावर यापूर्वीही विचार झालेला आहे. त्यावर कामदेखील सुरू आहे. परालीपासून सीएनजीची निर्मिती करणारा प्रकल्प करनाल येथे उभारण्यात येणार असल्याची चर्चाही गेल्या महिन्यात पुढे आली होती. जर्मन तंत्रज्ञानाचा वापर हा यासाठी करण्यात येणार आहे. 

तयार होणाऱ्या सीएनजीचा आसपासच्या गावांमधील ट्रॅक्टरमध्ये वापर होऊ शकतो. त्यासाठी बारा ट्रॅक्टर सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात आले आहेत. सीएनजीवर चालणारे हे देशातील पहिलेच ट्रॅक्टर असतील. असाही दावा यासोबत करण्यात आला आहे. हा प्रकल्प ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे प्रमुख अजय बंसल यांच्या वतीने विविध कंपन्यांच्या सहभागाने उभारण्यात येत आहे. पुढच्या वर्षी मे मध्ये प्रकल्प सुरू होईल. या प्रकल्पामुळे आसपासच्या 15 गावांमध्ये शेतात पराली जाळण्याचा प्रकार बंद होईल.

दररोज 10 हजार किलो सीएनजी

एका प्रकल्पाच्या ठिकाणी शंभर टन परालीपासून तयार झालेल्या पावडरने दहा हजार झालेल्या पावडरने दहा हजार किलो सीएनजीचे उत्पादन केले जाईल. ज्यांच्या शेतातील पराली वापरण्यात आली आहे त्यांना स्वस्त दरात सीएनजी विकण्यात येईल. 

दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. दिल्लीतील प्रदूषणात वाहनांच्या धुराचा सहभाग असल्याने राज्याला ही समस्या भेडसावत आहे. अशातच शेजारच्या राज्यात शेतकरी पराली जाळत असल्याने प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनांसाठी सम-विषम नियम लागू करून सरकारने काही प्रमाणात प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. गाडीच्या क्रमांकाचा शेवटचा आकडा सम असेल तर सम दिवसांना रस्त्यावर फिरण्याची अनुमती असेल. तसेच विषम आकड्यांसाठी लागू असेल. रविवार वगळता दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत वाहतुकीसाठी हा नियम लागू असणार आहे. यातून दुचाकींना सवलत देण्यात आली आहे. तसेच रुग्णवाहिका, स्कूल बस, महिला यांना यातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय व्हीआयपींनाही या नियमातून वगळण्यात आले आहे. 

 

Web Title: making commercially suitable cng from parali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.