शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

हॉकर्सला स्थायी करा

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

हॉकर्सला स्थायी करा

हॉकर्सला स्थायी करा

सीताबर्डी फुटपाथ दुकानदारांचा एल्गार : प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात धरणे

नागपूर :
महानगरपालिकेने केलेल्या लाल पट्ट्याच्या नियमानुसार सीताबर्डी येथील हॉकर्संना व्यवसाय करू द्यावा व त्यांना स्थायी करून सवार्ेच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सर्व हॉकर्सना पर्यायी व्यवस्थेशिवाय हटविण्यात येऊ नये, या मुख्य मागणीसाठी सीताबर्डी मेन रोड हॉकर्स फुटपाथ दुकानदार संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात गुरुवारी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे देण्यात आले.
शहरात हॉकर्स धोरण निश्चित करा, शहरात ७० हॉकर्स झोन तयार करण्यात यावे, हॉकर्सना स्थायी ओळखपत्र देण्यात यावे, ४४०० हॉकर्सची शासनाद्वारे नोंदणी करून त्यांना आर्थिक पाठबळ म्हणून कर्ज देण्यात यावे, हॉकर्सकडून प्रत्येकी १५०० रुपये घेण्यात आले. त्या निधीमधून हॉकर्सला सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि बर्डीतील दुकानदारांनी केलेले अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे, आदी मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करीत मनपा व पोलीस प्रशासनावर जोरदार रोष व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी माजी मंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा धरणे आंदोलन स्थळाला भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेस फुटपाथ दुकानदारांच्या बाजूने असून त्यांच्यावरील अन्याय सहन करणार नाही. वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी दुकानदारांना दिला.
धरणे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर, संदीप मेंढे, आसिफ भाई, विजय गजभिये, वाजीद अली, श्रीकांत श्रीवास, इमरान अन्सारी, तिलक कुरील विनोद गुप्ता, चंदू अग्रवाल आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

बॉक्स..

पोलीस आयुक्त-मनपा आयुक्तांना भेटणार

सीताबर्डी येथील हॉकर्सच्या मागण्यांबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, या मागणीसाठी शुक्रवारी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात येईल. यासंबंधात सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणारे आ. प्रकाश गजभिये यांनी आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रपरिषदेत दिला.
याप्रसंगी अविनाश तिरपुडे, गोपी आंभारे, इकबाल हाजी, संदीप शाहू, प्रमोद मिश्रा, बबलू खोडे, राजू राठी आदी उपस्थित होते.