“खरगेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा”; ममता बॅनर्जींचा INDIA आघाडीच्या बैठकीत प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 08:07 PM2023-12-19T20:07:13+5:302023-12-19T20:07:21+5:30

INDIA Opposition Alliance Meet: संसदेतून खासदारांचे निलंबन, जागावाटप, ईव्हीएम मशीन यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

make congress mallikarjun kharge pm candidate tmc mamata banerjee proposal at the india opposition alliance meet | “खरगेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा”; ममता बॅनर्जींचा INDIA आघाडीच्या बैठकीत प्रस्ताव

“खरगेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा”; ममता बॅनर्जींचा INDIA आघाडीच्या बैठकीत प्रस्ताव

INDIA Opposition Alliance Meet: एकीकडे संसद सुरक्षा त्रुटीबाबत विरोधक विरोधक चांगलेच आक्रमक झाले. यामुळे सुमारे १४९ खासदारांना राज्यसभा आणि लोकसभेतून निलंबित करण्यात आले. खासदार निलंबनाचे सत्र मंगळवारीही कायम राहिले. तर, दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्यात यावे, असा प्रस्ताव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी ठेवला.

या बैठकीपूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ५ सदस्यांची नॅशनल अलायन्स समिती स्थापन केली. या समितीत अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, मुकुल वासनिक यांना समितीचे समन्वयक करण्यात आले आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेतांमध्ये ईव्हीएमवर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच खासदारांच्या निलंबनाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या मुद्द्यावर विरोधक एकजुटीने लढा देतील, असे विश्वास व्यक्त करण्यात आला.

ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावाला अरविंद केजरीवाल यांचे समर्थन

विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा केली. यादरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याचा प्रस्ताव ममता बॅनर्जी यांनी मांडला. मल्लिकार्जून खरगे पंतप्रधानपदाचा चेहरा असावे, असे सांगण्यात आले. ममता बॅनर्जी यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आम्ही सुमारे २-३ तास ​​चर्चा केली आणि पुढील रणनीतीवर एकमत झाले. १४९ खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. आम्ही या कारवाईचा निषेध केला आहे. ही कारवाई लोकशाहीविरोधी असल्याबाबत एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.

दरम्यान, TMC आणि इंडिया आघाडीच्या अनेक पक्षांनी सर्व जागा वाटपाची चर्चा पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ ची अंतिम मुदत निश्चित केली आहे. पंतप्रधानपदासाठी इंडिया आघाडीकडून मल्लिकार्जून खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला असला तरी यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीत २८ पक्ष सहभागी झाले होते. 

 

Web Title: make congress mallikarjun kharge pm candidate tmc mamata banerjee proposal at the india opposition alliance meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.