शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आमदार, खासदारांना बरखास्त करण्याची व्यवस्था करा...; राघव चड्ढांनी केली मोठी मागणी, म्हणाले महाराष्ट्रात अशी सोय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:15 IST

Right to Recall MP, MLA : 'काम न करणाऱ्या खासदारांना घरी पाठवण्याचा अधिकार मतदारांना द्या!' आप खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत 'राईट टू रिकॉल' कायद्याची मागणी केली. सविस्तर बातमी वाचा.

काम न करणाऱ्या आणि आश्वासने पाळणाऱ्या लोकप्रतिनिधींना (खासदार आणि आमदार) मतदारांनी पदावरून हटवण्याची ताकद देणारा 'राईट टू रिकॉल' कायदा देशात लागू करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी आम आदमी पार्टीचे राज्यसभाखासदार राघव चड्ढा यांनी केली आहे. बजेट सत्र २०२६ दरम्यान शून्य प्रहरात बोलताना त्यांनी लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी या नवीन व्यवस्थेची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

राघव चड्ढा यांनी लोकशाहीतील एका मोठ्या त्रुटीवर बोट ठेवले. ते म्हणाले, "निवडणुकीपूर्वी नेते जनतेच्या मागे असतात, पण निवडणूक जिंकल्यावर जनता नेत्यांच्या मागे धावत असते. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे." सध्याच्या काळात पाच वर्षांचा कार्यकाळ मोठा असतो. जर एखाद्या क्षेत्रातील जनतेने चुकीचा प्रतिनिधी निवडला, तर त्यांना पुढील पाच वर्षे पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नसतो. 'राईट टू रिकॉल' हा राजकारण्यांविरुद्धचे शस्त्र नसून तो लोकशाहीचा विमा असल्याचे त्यांनी सांगितले.

जगातील उदाहरणे आणि भारतीय संदर्भचड्ढा यांनी नमूद केले की, कॅनडा आणि स्वित्झर्लंडसह जगातील २४ हून अधिक लोकशाही देशांमध्ये ही व्यवस्था अस्तित्वात आहे. भारतातही राष्ट्रपतींवर महाभियोग चालवणे, उपराष्ट्रपतींना हटवणे किंवा न्यायाधीशांना पदावरून दूर करणे यासाठी कायदे आहेत. तसेच सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याची तरतूद आहे. मग मतदारांना काम न करणाऱ्या प्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार का नसावा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा दाखलाविशेष म्हणजे, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेच्या माध्यमातून प्रतिनिधींना हटवण्याची तरतूद आहे. हीच व्यवस्था संसद आणि विधानसभेसाठीही लागू करण्याची वेळ आली आहे, असे चड्ढा म्हणाले. यामुळे राजकीय पक्षांना चांगले उमेदवार देण्यास मदत होईल आणि लोकशाहीतील "नॉन-परफॉर्मिंग असेट्स" (काम न करणारे नेते) दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात नुकतेच एका गावात सरपंच महिलेला मतदान घेऊन हटविण्यात आले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Implement 'Right to Recall' for Inactive MPs, MLAs: Raghav Chadha.

Web Summary : Rajya Sabha MP Raghav Chadha demands a 'Right to Recall' law, empowering voters to remove non-performing MPs and MLAs. He cites global examples and existing provisions in some Indian states, advocating for stronger democratic accountability.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाAAPआपMember of parliamentखासदारMLAआमदार