शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
3
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
4
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
5
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
6
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
8
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
9
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
10
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
11
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
12
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
14
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
15
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
16
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
17
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
18
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
19
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
20
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल

सरकारचे बहुमत राज्यपालांच्या मर्जीने नव्हे, फक्त विधानसभेतच होते सिद्ध - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 07:04 IST

बहुमताचा पाठिंबा असलेले सरकारच सत्तेवर येऊ शकते व असेच सरकार राज्य करू शकते. सरकारला बहुमताचा पाठिंबा आहे की नाही, याचा निर्णय राज्यपालांच्या मर्जीवर अवलंबून नसतो, तर विधानसभेतच तो होऊ शकतो

नवी दिल्ली : बहुमताचा पाठिंबा असलेले सरकारच सत्तेवर येऊ शकते व असेच सरकार राज्य करू शकते. सरकारला बहुमताचा पाठिंबा आहे की नाही, याचा निर्णय राज्यपालांच्या मर्जीवर अवलंबून नसतो, तर विधानसभेतच तो होऊ शकतो, असा स्पष्ट निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महिनाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या घोळावर पडदा टाकण्याच्या दिशेने निर्णायकी पाऊल टाकले.स्थिर सरकार व सुशासन हा जनतेचा हक्क आहे, हे अधोरेखित करत न्यायालयाने असेही नमूद केले की, आमदारांच्या फोडाफोडीसारख्या बेकायदा प्रकारांना पायबंद बसावा, लोकशाही प्रक्रिया सुरळितपणे सुरू राहावी आणि राज्यात स्थिर सरकारची शाश्वती व्हावी, यासाठी सरकारने विधानसभेत लगेच बहुमत सिद्ध करणे गरजेचे आहे.शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या याचिकेवर हा अंतरिम आदेश देताना न्या. एन. व्ही. रमणा, न्या. अशोक भूषण व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने वरील निरीक्षणे नोंदविली. न्यायसंस्था व विधिमंडळ या राज्यघटनेने स्थापन केलेल्या लोकशाहीच्या दोन स्तंभांनी परस्परांच्या मर्यादा ओळखून काम करणे अपेक्षित असले, तरी लोकशाहीेची शुचिता कायम राखण्यासाठी व घटनात्मक नीतिमत्ता अबाधित ठेवण्याचा अखेरचा उपाय म्हणून काही वेळा न्यायालयास हस्तक्षेप करणे गरजेचे ठरते. हे प्रकरण असे अपवादात्मक वर्गात मोडणारे आहे, असेही न्यायालयाने म्हटले.महाराष्ट्रात राज्यपालांनी नेमलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गुरुवारी सायंकाळी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, असा अंतरिम आदेश देताना न्यायालयाने पुढील निर्देश दिले -राज्यपालांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांची तत्काळ नियुक्ती करावी...हंगामी अध्यक्षांनी नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदस्यत्वाची शपथ देण्याचे काम पूर्ण करावे.शपथविधी उरकताच हंगामी अध्यक्षांनी फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शकठरावाचे कामकाज सुरू करावे. विश्वासदर्शक ठरावावर गुप्त मतदान घेण्यात येऊ नये. मतदानाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करावे.नंतरच्या घटनाक्रमानंतर विश्वासदर्शक ठरावमंजूर करून घेण्याची गरजच राहिली नाही.हा आदेश देताना खंडपीठाने कर्नाटक (सन २०१८ व १९९६), गोवा (२०१७), उत्तराखंड (२०१६), झारखंड (२०१५) व उत्तर प्रदेश (१९९९) या राज्यांत अशीच परिस्थिती निर्माण झाली असताना दिलेल्या निकालांचा आधार घेतला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय