सुकमा आणि बीजापूरमध्ये मोठी कारवाई, ३ नक्षलवाद्यांचा खात्मा, जवानांच्या मृत्यूचा घेतला बदला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:43 IST2025-01-09T16:42:44+5:302025-01-09T16:43:04+5:30
Encounter In Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून केलेल्या हल्ल्यात आठ जवान आणि एका वाहन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेला ७२ तास उलटण्यापूर्वीच छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात एक मोठी कारवाई केली आहे.

सुकमा आणि बीजापूरमध्ये मोठी कारवाई, ३ नक्षलवाद्यांचा खात्मा, जवानांच्या मृत्यूचा घेतला बदला
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून केलेल्या हल्ल्यात आठ जवान आणि एका वाहन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेला ७२ तास उलटण्यापूर्वीच छत्तीसगडपोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात एक मोठी कारवाई केली आहे. सुकमा-बीजापूरच्या सीमेवर नक्षलवाद्यांविरोधात एक मोठी कारवाई करत पोलिसांनी अनेक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या चार तासांपासून सुरू असलेल्या या चकमकीमध्ये आतापर्यंत ३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. मात्र या वृत्ताची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार जगरगुंडा एरिया नक्षलवादी समितीच्या दोन डझनांहून अधिक नक्षलवाद्यांना पोलिसांच्या पथकाने घेरले आहे. तसेच मागच्या चार तासांपासून ही चकमक सुरू आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार बीजापूर येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर नक्षलवादी आणखी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. पोलिसांना याचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी या नक्षलवाद्यांना चहुबाजूंनी घेरले.
या चकमकीबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही चकमक आज सकाळी सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर सुरू झाली. सुरक्षा दलांचं एक संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर निघालं असताना या चकमकीला तोंड फुटलं. यामध्ये जिल्हा राखीव गार्ड, विशेष कार्य दल आणि कोब्रा यांच्या जवानांचा समावेश आहे. तसेच चकमकीच्या ठिकाणी अधूनमधून गोळीबार होत आहे.