सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:44 IST2025-12-25T13:42:47+5:302025-12-25T13:44:42+5:30
दोन दिवसांपूर्वीच ओडिशातील मलकानगिरी जिल्ह्यात 22 माओवाद्यांनी सरेंडर केले आहे.

सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
भुवनेश्वर: ओडिशा पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी ख्रिसमसच्या दिवशी राबवलेल्या मोठ्या संयुक्त कारवाईत CPI (माओवादी) संघटनेचा सेंट्रल कमिटी सदस्य आणि ओडिशातील माओवादी कारवायांचा प्रमुख कमांडर गणेश उइके याला ठार केले आहे. या चकमकीत एकूण चार माओवादी ठार झाले असून, त्यात दोन महिला कॅडरचा समावेश आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्पेशल इंटेलिजन्स विंगकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 23 पथकांचे संयुक्त ऑपरेशन राबवण्यात आले. यात माओवादी कमांडर गणेश उइकेसह चार माओवाद्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला माओवाद्यांचाही समावेश आहे. यातील गणेश उइकेवर 1.1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते. उर्वरित तीन ठार माओवाद्यांची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही.
Odisha: Based on intelligence received from the Special Intelligence Wing, a joint operation involving 23 teams (20 SOG, 2 CRPF, 1 BSF) was launched in the Chakapad police station area of Kandhamal district and the Rambha forest range in the bordering areas of Ganjam district.…
— ANI (@ANI) December 25, 2025
चकमक कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा पोलिसांच्या SOG (स्पेशल ऑपरेशन ग्रुप) ची एक लहान मोबाइल टीम गुम्मा जंगलात शोधमोहीम राबवत होती. याच दरम्यान त्यांचा माओवाद्यांशी सामना झाला. चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. यात चार माओवादी ठार झाले. गणेश उइकेच्या मृत्यूनंतर ओडिशातील माओवादी नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम आणखी तीव्र केली असून, उर्वरित माओवादी कॅडरचा शोध सुरू आहे.
शस्त्रसाठा जप्त
चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एक रिव्हॉल्व्हर, एक .303 रायफल, एक वॉकी-टॉकी सेट जप्त केला आहे. या कारवाईत सुरक्षा दलाकडील कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या संपूर्ण परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
22 Maoists, including 10 women cadres, surrendered before the police in Malkangiri district, Odisha.
The surrender took place in the presence of Odisha Director General of Police, Y B Khurania. It comes after the #Odisha government revised its Maoist surrender and rehabilitation… pic.twitter.com/SzNY41C0NP— All India Radio News (@airnewsalerts) December 23, 2025
आत्मसमर्पणानंतर लगेच कारवाई
ही चकमक शेजारच्या मलकानगिरी जिल्ह्यात 22 माओवाद्यांनी ओडिशाचे डीजीपी वाय. बी. खुराना यांच्यासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर अवघ्या एका दिवसात घडली आहे. त्यामुळे राज्यातील माओवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.