कुलगाममध्ये मोठी चकमक, लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 08:33 AM2020-07-17T08:33:57+5:302020-07-17T08:36:42+5:30

कुलगाममधील नागनाद चिम्मेर परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली.

In a major encounter in Kulgam, the army killed three terrorists | कुलगाममध्ये मोठी चकमक, लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

कुलगाममध्ये मोठी चकमक, लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

Next
ठळक मुद्देकुलगाममधील नागनाद चिम्मेर परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होतीत्यानंतर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केलीलपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले

श्रीनगर - लष्कर आणि इतर सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात उघडलेली आक्रमक मोहीम अधिकच तीव्र झाली आहे. दरम्यान, काश्मीरमधील कुलमाग जिल्ह्यातील नागनाज चिम्मेर परिसरात उडालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच परिसराच शोधमोहीम आणि चकमक अद्यापही सुरू आहे.

कुलगाममधील नागनाद चिम्मेर परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले. त्यानंतर अजून एक दहशतवादी मारला गेला. दरम्यान, या परिसरातील चकमक आणि शोधमोहीम अद्याप सुरू आहे.

यापूर्वी काल काश्मीरमधील कुपवाडा परिसरात लष्कराने नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. यादरम्यान लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले होते.  कुपवाडामधील केरन येथे नियंत्रण रेषेच्या पलीकडे काही जण संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न लष्कराने केला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला.   

इतर महत्त्वाच्या बातम्या 

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

Web Title: In a major encounter in Kulgam, the army killed three terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.