शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत 100 दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 18:11 IST

Jammu Kashmir: 1 जानेवारी 2022 ते 12 जून 2022 पर्यंत खोऱ्यातील 160-180 सक्रीय दहशतवाद्यांपैकी 100 जणांचा खात्मा झाला आहे.

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आउट वेगाने सुरू आहे. 2022 च्या पहिल्या पाच महिन्यांत सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या 160-180 दहशतवाद्यांपैकी 12 जूनपर्यंत सुरक्षा दलांनी 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

काश्मरीचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, या वर्षाच्या 5 महिने आणि 12 दिवसांत ठार झालेल्या 100 दहशतवाद्यांपैकी 71 स्थानिक तर 29 विदेशी दहशतवादी आहेत. सर्व विदेशी दहशतवादी पाकिस्तानी नागरिक आहेत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी लष्कर-ए-तैयबाला (LET) सर्वाधिक नुकसान झाले असून, त्यांचे 63 दहशतवादी मारले गेले आहेत.

जैश-ए-मोहम्मदचे 24 दहशतवादी ठारतसेच, जैश-ए-मोहम्मद (JeM) ने 24 दहशतवादी गमावले आहेत. बाकीचे अन्सार-गजवातुल हिंद आणि ISJK चे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात 27 दहशतवादी मारले गेले, एप्रिलमध्ये 24, मार्चमध्ये 13, फेब्रुवारीमध्ये 7 आणि जानेवारीमध्ये 20 दहशतवादी मारले गेले. तसेच, जूनच्या पहिल्या 12 दिवसांत 9 दहशतवादी मारले गेले आहेत.

2021 मध्ये 50 दहशतवादी मारले ही संख्या 2021 मध्ये याच काळात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. 2021 मध्ये याच कालावधीत सुरक्षा दलांनी 49 स्थानिक आणि 1 परदेशी दहशतवाद्यांसह 50 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीDeathमृत्यूDefenceसंरक्षण विभाग