शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर दंड भरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 14:46 IST

SBI ATM Withdrawal Rules: स्टेट बँक मेट्रो शहरांमध्ये एका ATM कार्डाद्वारे महिन्याला 8 वेळा विनाशुल्क पैसे काढण्याची मुभा देते. याचाच अर्थ जर तुम्ही मेट्रो शहरात राहत असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क न आकारता 8 वेळा पैसे काढता येणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ने करोडो ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. SBI ने एटीएम (ATM) मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. यानुसार आता मोफत ट्रान्झेक्शनची लिमिट संपल्यानंतर पुन्हा रक्कम काढल्यास दंड आकारला जाणार आहे. एवढेच नाही तर खात्यामध्ये तेवढे पैसे नसतील आणि ट्रान्झेक्शन फेल झाले तरीही दंड आकारला जाणार आहे. 

स्टेट बँक मेट्रो शहरांमध्ये एका ATM कार्डाद्वारे महिन्याला 8 वेळा विनाशुल्क पैसे काढण्याची मुभा देते. याचाच अर्थ जर तुम्ही मेट्रो शहरात राहत असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क न आकारता 8 वेळा पैसे काढता येणार आहेत. मात्र, यानंतर केल्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रान्झेक्शनवर तुम्हाला शुल्क आकारले जाणार आहे. SBI ATM मधून फ्री पैसे काढण्याच्या नियमांनुसार (ATM Withdrawal Rules) स्टेट बँकेच्या एटीएममधून ५ वेळा आणि अन्य बँकांच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढता येतात. मेट्रो शहरांमध्ये मुंबई,  नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरु आणि हैदराबाद सहभागी आहेत. 

याशिवाय गैर मेट्रो शहरांमध्ये SBI चे खातेधारक 10 वेळा एटीएममधून विनाशुल्क पैसे काढू शकतात. यामध्ये 5 वेळा SBI ATM मधून आणि 5 वेळा अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. ही लिमिट संपल्यानंतर बँक तुमच्याकडून 10 रुपये ते 20 रुपये शुल्क वसूल करू शकते. 

पुरेसा बॅलन्स नसल्यास...एसबीआयच्या दुसऱ्या नियमानुसार, एटीएममधून जेवढे पैसे काढायचे आहेत आणि तेवढे पैसे खात्यात नसतील तर तुमच्या प्रत्येक फेल ट्रान्झेक्शनला 20 रुपये दंड आणि जीएसटी शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे आधी बॅलन्सची माहिती घेूनच पैसे काढावे लागणार आहेत.

तिसरा नियम....जर खातेधारकाला एटीएममधून 10000 पेक्षा जास्त रक्कम काढाय़ची असल्यास त्याच्या मोबाईलवर ओटीपी (OTP) पाठविला जाणार आहे. तो ओटीपी पुन्हा एटीएममध्ये टाकून पैसे काढता येणार आहेत. ही ओटीपीची सुविधा रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएमणधून पैसे काढत असाल तर ओटीपी पाठविला जाणार नाही. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

महत्वाचे! गृहकर्जाच्या EMIवर बँका मोठी सूट देण्याच्या तयारीत; करत आहेत प्लॅनिंग

मुकेश अंबानी चार छोट्या कंपन्या खरेदी करणार; रिलायन्सकडून जोरदार प्रयत्न

Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता

BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग

बघतोच अमेरिका F-16V कसे उडवितो! चीन खवळला; तैवानची एयरफील्डच उद्ध्वस्त करण्याची धमकी

सावधान! Work From Home चा मोठा फटका बसणार; Income Tax भरताना नाकीनऊ येणार

हवामान बदल धोक्याचा; 'देवीसारखे जुने व्हायरस आयुष्यात परतणार', संशोधकांचा इशारा

टॅग्स :SBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाMONEYपैसाatmएटीएम