बिहारमधील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या युकवाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचे नाव रिजवी असल्याचे समजते. तो दरभंगामध्येच राहतो. त्याने काँग्रेस रॅली दरम्यान पंतप्रधान मोदींसंदर्भात अपशब्द वापरले होते. यावरून राजकीय वातावरणही तापले होते. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
खरेतर, बिहार निवडणुकीच्या तोंडावरच विरोधी पक्ष मतदार हक्क यात्रेचे आयोजित करत आहेत. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत. बुधवारी (२७ ऑगस्ट) दरभंगा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले गेले होते. मात्र, यावेळी राहुल अथवा तेजस्वी व्यासपीठावर उपस्थित नव्हते. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरही शेअर करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली नाराजी -अमित शाह यांनी, यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली होती. या ते म्हणाले होते, "बिहारमधील दरभंगा येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या स्वर्गीय मातोश्री यांच्यासंदर्भात काँग्रेस आणि आरजेडीच्या व्यसपीठावरून ज्या पद्धतीने आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला, तो कोवळ निदास्पदतच नाही, तर आपल्या लोकशाहीला कलंकित करणारा आहे."
जेपी नड्डांनी केली माफीची मागणी -भारतीय जना पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यां प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्याकडे माफीची मागणी केली आहे. ते गुरुवारी म्हणाले, "काँग्रेसच्या तथाकथित 'व्होट अधिकार यात्रे'मध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस-राजदच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींसंदर्भात अपशब्द वापरण्यात आले, ते अत्यंत निंदास्पद आहे. दोन राजकुमारांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादांचे उलंघन केले आहे. एवढेच नाही तर, त्यांनी बिहारमध्येच बिहारी संस्कृतीचाही तिरस्कार केला आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना यासाठी माफी मागायला हवी."