INS Ranvir: मोठी दुर्घटना, मुंबईत आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट, तीन जवानांना हौतात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 09:33 PM2022-01-18T21:33:17+5:302022-01-18T21:43:55+5:30

INS Ranvir: मुंबईतील नौदलाचा तळ असलेल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे असलेल्या आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात नौदलाचे तीन जवान हुतात्मा झाले आहेत.

Major accident, massive blast at INS Ranveer in Mumbai, martyrdom of three soldiers | INS Ranvir: मोठी दुर्घटना, मुंबईत आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट, तीन जवानांना हौतात्म्य

INS Ranvir: मोठी दुर्घटना, मुंबईत आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट, तीन जवानांना हौतात्म्य

Next

मुंबई - मुंबईतील नौदलाचा तळ असलेल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे असलेल्या आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात नौदलाचे तीन जवान हुतात्मा झाले आहेत. दरम्यान जहाजावरील कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मात्र जहाजाला फार मोठं नुकसान झालेलं नाही.  

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज नेव्हल डॉकयार्डमध्ये आयएनएस रणवीरच्या अंतर्गत भागात भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात आणली. या स्फोटात जहाजाचे फारसे नुकसान झालेलेले नाही. तसेच हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

 

Web Title: Major accident, massive blast at INS Ranveer in Mumbai, martyrdom of three soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app