तेलंगाणामध्ये मोठी दुर्घटना, बोगद्याचा काही भाग कोसळून सहा कामगार अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:09 IST2025-02-22T16:09:19+5:302025-02-22T16:09:46+5:30

Telangana Tunnel Accident: तेलंगाणामधील नागरकुरनूल जिल्ह्यामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एकका बोगद्याचा काही भाग कोसळल्याने सहा कामगार अडकल्याची माहिती समोर येत आहे. या कामगारांना बाहेर काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Major accident in Telangana, six workers trapped after part of tunnel collapses | तेलंगाणामध्ये मोठी दुर्घटना, बोगद्याचा काही भाग कोसळून सहा कामगार अडकले

तेलंगाणामध्ये मोठी दुर्घटना, बोगद्याचा काही भाग कोसळून सहा कामगार अडकले

तेलंगाणामधील नागरकुरनूल जिल्ह्यामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एकका बोगद्याचा काही भाग कोसळल्याने सहा कामगार अडकल्याची माहिती समोर येत आहे. या कामगारांना बाहेर काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कोसळलेल्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा आकडा सहा आहे की आठ, याबाबत स्पष्टता येऊ शकलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना तेलंगाणामधील नागरकुरनूल जिल्ह्यातील श्रीशैलम लेफ्ट बँक कालव्याच्या बांधकाम सुरू असलेल्या भागात आज घडली. येथे कालव्याच्या छताचा एक भाग कोसळला. दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी कंपनीचं एक पथक बोगद्यामध्ये गेली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बोगद्यामध्ये ६ ते ८ कामगार अडकले असण्याची शक्यता आहे.

तेलंगाणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने या घटनेबाबत सांगितले की, या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्याचे सिंचनमंत्री एन. उत्तम कुमार रेड्यी, सरकारी सल्लागार आदित्यनाथ दास आणि इतर अधिकारी विशेष हेलिकॉप्टरने  घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.  

Web Title: Major accident in Telangana, six workers trapped after part of tunnel collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.