शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

निवडणुकीत मूळ मुद्दा बेरोजगारीच्या समस्येचाच, प्रवीण तोगडियांचे परखड मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 4:13 AM

नवी दिल्ली : गुजरातमध्ये हिंदुत्वाला पर्याय नाही हे लक्षात येताच यंदा निवडणुकीत राजकारणाचेच हिंदूकरण झाले आहे.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : गुजरातमध्ये हिंदुत्वाला पर्याय नाही हे लक्षात येताच यंदा निवडणुकीत राजकारणाचेच हिंदूकरण झाले आहे. पूर्वी भाजपाचे अनुयायी मंदिरांमध्ये जायचे. आता राहुल गांधीही द्वारका, चामुंडा मंदिरांमध्ये जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही देवळांची परिक्रमा करीत आहेत. तथापि गुजरातमध्ये मूळ प्रश्न आहे वाढणाºया बेरोजगारीचा, शेतकºयांच्या समस्यांचा आणि बंद कारखाने सुरू करण्याचा. या समस्यांचे निराकरण होत नाही, तोपर्यंत गुजराती जनतेची मने जिंकता येणार नाहीत, असे परखड उद्गार विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीवर दिलेल्या मुलाखतीत काढले.भारताचा जीडीपी वाढतोय, असे म्हणतात. मात्र त्या प्रमाणात रोजगार निर्माण होताना दिसत नाहीत. राज्यात २२ हजार कोटींचा टाटा नॅनोचा कारखाना आला आणि रोजगार मिळाले अवघ्या २२00 लोकांना. अशी जॉबलेस ग्रोथ काय कामाची? गुजरातमध्ये २0 लाख तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. विविध आंदोलनांत सहभागी होत आहेत. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी व अल्पेश ठाकूर यांनी ज्ञाती संघटनांच्या मंचावरून असंतोषाचा हुंकार ऐकवला. मात्र तिन्ही आंदोलनांचे मुख्य सूत्र बेरोजगारी हेच आहे. या नेत्यांच्या आंदोलनात बेरोजगारी, महागाई व गरिबीच्या समस्यांचेच सूर ऐकायला मिळतात. गुजरातेत ४५ हजारांहून अधिक लघू व मध्यम कारखाने बंद पडले आहेत. बेरोजगारांच्या संख्येत त्यामुळे वाढ झाली आहे. नॅनोपेक्षा बंद कारखाने सुरू करावेत, असेही ते म्हणाले.>सामान्य जनतेला परवडेल, अशा दरात उच्चशिक्षणाच्या सोयी द्या!मी शेतकरी कुटुंबात जन्मलो. मला ४0 वर्षांपूर्वी १९७५ साली एमबीबीएससारखी पदवी मिळवता आली, कारण मला अवघी ३00 रुपये फी भरावी लागली. आज त्याच पदवीसाठी किमान एक कोटी रुपये खर्च येतो. तुम्ही ४0 वर्षांत कुठे नेऊ न ठेवलाय हा देश? शिक्षण महागले आहे. खासगी संस्थांनी या क्षेत्रावर कब्जा केलाय. त्यांना कोण रोखणार? सामान्य जनतेला परवडेल, अशा दरात देशात उच्चशिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत, असेही तोगडिया म्हणाले.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Gujaratगुजरात