देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचवणं हे आमच्यासमोरील मुख्य आव्हान : अदर पुनावाला

By जयदीप दाभोळकर | Published: January 12, 2021 04:14 PM2021-01-12T16:14:59+5:302021-01-12T16:19:42+5:30

अन्य देशांकडूनही मागणी, भारतीयांना प्राधान्य; देशात लसीतून नफा मिळवणार नाही, पुनावाला यांचं वक्तव्य

The main challenge before us is to get the corona virus vaccine to every person in the country serum Adar Punawala | देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचवणं हे आमच्यासमोरील मुख्य आव्हान : अदर पुनावाला

देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचवणं हे आमच्यासमोरील मुख्य आव्हान : अदर पुनावाला

Next
ठळक मुद्देमहिन्याला ७ ते ८ कोटी डोसेसचं उत्पादनअन्य देशांकडूनही लसीला मागणी, पुनावाला यांची माहिती

सीरम इन्स्टिटयूटची कोविशिल्ड ही लस देशांतर्गत वापरासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ३ कंटेनर लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले आणि पुण्यासह देशात एकच उत्साह आणि आनंदाचे वातावरण तयार झाले. केंद्र शासनाने केलेल्या घोषणेनुसार देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. त्याच धर्तीवर सीरम इन्स्टिटयूटच्या कोविशिल्ड लसीच्या उत्पादन व वितरणाने जोर पकडला आहे. दरम्यान, लसीचं वितरण सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आनंद व्यक्त केला. तसंच तो आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण होता असं म्हणत आता प्रत्येक देशवासीयांपर्यंत ही लस पोहोचवणं हे आपल्यासमोरील मुख्य आव्हान असल्याचंही ते म्हणाले. 

"हा आमच्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे की लसीचं आमच्या कंपनीतून वितरण होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत ही लस पोहोचवण्याचं आव्हान आमच्यासमोर आहे. २०२१ या वर्षातील आमच्यासाठी हे मुख्य आव्हान आहे. पाहूया हे कसं पूर्ण करता येईल," असं पुनावाला म्हणाले. 



"भारत सरकारसाठी आम्ही त्यांच्या विनंतीवरून पहिल्या १० कोटी डोससाठी किंमत २०० रूपये निश्चित केली आहे. आम्ही सामान्य व्यक्ती, गरीब, आरोग्य सेवांशी निगडीत कर्मचाऱ्यांचा आदर करतो. यानंतर बाजारात ही लस १००० रूपयांना मिळणार आहे," असं पुनावाला यांनी सांगितलं. "भारत सरकारसाठी आम्ही योग्य किंमतीलाच ही लस पुरवणार आहोत. परंतु या लसीची किंमत २०० रूपयांपेक्षा जास्त असणार आहे, जो आमचा उत्पादन खर्च आहे. या लसीच्या विक्रीतून कोणताही नफा मिळवायचा नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे. पहिल्या दहा कोटी डोस सोबतच देश आणि केंद्र सरकारला आम्ही मदत करणार आहोत," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 



"अनेक देशांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाला आपल्या देशांमध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या लसी पाठवण्यासाठी पत्र लिहिलं आहे. आम्ही प्रत्येकाची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आपल्या देशाला आणि आपल्या देशातील नागरिकांच्या आरोग्याची काळजीदेखील घ्यायची आहे. आम्ही ही लस आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतही पाठवण्याचे प्रयत्न करत आहेोत. आम्ही सर्वच ठिकाणी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आहोत," असंही पुनावाला यांनी नमूद केलं. 



७-८ कोटी डोसची निर्मिती

"आपली कंपनी दर महिन्याला ७ ते ८ कोटी डोसेसची निर्मिती करत आहे. किती लसी भारतात वितरीत करायच्या आहेत आणि किती अन्य देशाना पाठवायच्या आहेत याचीदेखील तयारी सुरू आहे. आम्ही ट्रक, व्हॅन्स, कोल्ड स्टोरेजसाठीही काही जणांसोबत करार केले आहेत," असं पुनावाला म्हणाले.

Web Title: The main challenge before us is to get the corona virus vaccine to every person in the country serum Adar Punawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.