आता शत्रूंची झोप उडणार! आयएडीडब्लूएसची चाचणी यशस्वी, डीआरडीओला मोठे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 15:55 IST2025-08-24T15:53:16+5:302025-08-24T15:55:05+5:30

डीआरडीओने भारताच्या लष्करी सामर्थ्याला आणखी बळकटी देत, बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणालीच्या दिशेने मोठे यश मिळवले आहे.

Maiden flight Tests of Integrated Air Defence Weapon System (IADWS) was successfully conducted | आता शत्रूंची झोप उडणार! आयएडीडब्लूएसची चाचणी यशस्वी, डीआरडीओला मोठे यश

आता शत्रूंची झोप उडणार! आयएडीडब्लूएसची चाचणी यशस्वी, डीआरडीओला मोठे यश

डीआरडीओने भारताच्या लष्करी सामर्थ्याला आणखी बळकटी देत, बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणालीच्या दिशेने मोठे यश मिळवले आहे. डीआरडीओने एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीच्या (IADWS)  पहिल्या उड्डाणाची यशस्वी चाचणी घेतली. शनिवारी दुपारी ओडिशाच्या किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आली. आयएडीडब्लूएस ही एक अत्याधुनिक बहुस्तरीय प्रणाली असून, त्यात अनेक स्वदेशी क्षेपणास्त्रे आणि एक शक्तिशाली लेसर शस्त्रांचा समावेश आहे. ही प्रणाली शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे, ज्यामुळे भारताची हवाई संरक्षण क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

डीआरडीओने नुकत्याच घेतलेल्या आयएडीडब्लूएसच्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि भारतीय सशस्त्र दलाचे अभिनंदन केले आहे. आयएडीडब्लूएसमध्ये क्विक रिअ‍ॅक्शन सरफेस टू एअर मिसाईल, अॅडव्हान्स्ड व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम मिसाईल आणि डायरेक्टेड एनर्जी वेपन यांचा समावेश आहे. डायरेक्टेड एनर्जी वेपन हे हवेत शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्रे नष्ट करण्यास सक्षम आहे.

राजनाथ सिंह काय म्हणाले?
"डीआरडीओच्या या यशस्वी चाचणीमुळे देशाची बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमता अधिक मजबूत झाली आहे. ही प्रणाली शत्रूच्या हवाई धोक्यांपासून देशातील महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल", असे ते म्हणाले.

Web Title: Maiden flight Tests of Integrated Air Defence Weapon System (IADWS) was successfully conducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.