Vidhan Sabha 2019: महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसच्या ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 04:24 AM2019-09-29T04:24:56+5:302019-09-29T04:25:35+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेतृत्वाने ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले असून, पितृपक्ष संपताच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जारी केली जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 : Maharashtra Congress names four candidates for Congress | Vidhan Sabha 2019: महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसच्या ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब

Vidhan Sabha 2019: महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसच्या ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब

googlenewsNext

- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेतृत्वाने ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले असून, पितृपक्ष संपताच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जारी केली जाण्याची शक्यता आहे.
पक्ष सूत्रांनुसार शुक्रवारी रात्री महाराष्ट्राचे प्रभारी व काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे यांनी उमेदवारी यादीचे अवलोकन केले. काँग्रेसच्या निवड समितीने मंजूर केलेल्या उमेदवारांची नावे यादीत असल्याची शहानिशा केली. पितृपक्षामुळे उमेदवारांची यादी जारी केली नसावी, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठीही काँग्रेसच्या उमेदवारांची निवड करण्याचे काम चालू आहे. येत्या एक-दोन दिवसांत ही यादीही जारी केली जाईल. उमेदवारांची यादी अंतिम करण्याच्या दृष्टीने गुलाम नबी आझाद, कुमार सैलजा, मधुसूदन मिस्त्रींसह अन्य नेते सल्लामसलत करीत आहेत.

हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी जवळपास १४०० जणांनी उमेदवारी मागितली आहे. कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला नाही, यासाठी सर्व पैलूने सल्लामसलत केली जात आहे.

तथापि, एका कुटुंबातील एकाच सदस्याला उमेदवारी देण्याचा तत्त्वत: निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या या निर्णयामुळे भूपेंद्र सिंह हुड्डा, किरण चौधरी, कुलदीप बिष्णोई आणि रणजित सिंह यांच्यासारख्या नेत्यापुढे पेच निर्माण झाला आहे. कारण या नेत्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 : Maharashtra Congress names four candidates for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.