शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्र अव्वल; देशात २१६, महाराष्ट्रात ३९, इतर १०४ जणांना सक्तीची सेवानिवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 12:49 IST

दिल्लीतील २१ अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अधिकाऱ्यांवर सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : देशात नागरी सेवेतील अधिकाऱ्यांवर २१६ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यातील सर्वाधिक ३९ गुन्हे महाराष्ट्रात आहेत. २०१८ ते ३० जून २०२३ या मागील पाच वर्षांच्या कालावधीतील ही प्रकरणे आहेत. दिल्लीतील २१ अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अधिकाऱ्यांवर सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत.

देशात सर्वाधिक नागरी सेवा अधिकाऱ्यांची संख्या उत्तर प्रदेशात असली तरी या राज्यात १७ गुन्हे दाखल आहेत. पश्चिम बंगालमध्ये एक अधिकारी तर गोव्यात तीन अधिकारी फौजदारी गुन्ह्यांना सामोरे जात आहेत. अखिल भारतीय सेवा (वर्तन) नियम, १९६८ आणि केंद्रीय नागरी सेवा (वर्तन) नियम १९६४ने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता घालून दिलेली असून, त्याचे सेवेतील सदस्याने नेहमी पालन केले पाहिजे, असे म्हटले आहे.

केंद्र सरकारने कठोर कारवाई करीत ३० जून २०२३ पूर्वी एकूण १०४ अधिकाऱ्यांना (गट अ आणि ब) मुदतीपूर्वी सेवानिवृत्त केलेले आहे. मागील तीन वर्षांत एफआर ५६(जे)/तत्सम तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 

मिशन कर्मयोगी राष्ट्रीय मोहीमकेंद्र सरकारने नागरी सेवा क्षमता विकासासाठी सप्टेंबर २०२० मध्ये मिशन कर्मयोगी ही राष्ट्रीय मोहीम हाती घेतली आहे. व्यावसायिक, सुप्रशिक्षित आणि भविष्यकाळाचा वेध घेणारी नागरी सेवा निर्माण करणे, भारताचा विकास करणे, राष्ट्रीय कार्यक्रम आणि प्राधान्यक्रम ठरविण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली आहे. कार्मिक विभागाने प्रतिनियुक्तीच्या बाबींवरही सूचना जारी केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, प्रतिनियुक्ती/विदेशी सेवेचा कालावधी हा प्रत्येक संवर्ग पदाच्या भरती नियमानुसार असेल किंवा तो ५ वर्षे असेल. तो काही कारणास्तव विशिष्ट प्रकरणांमध्ये ७ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागMaharashtraमहाराष्ट्रUttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्लीEmployeeकर्मचारी