शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

‘मोदीकेअर’ योजनेत महाराष्ट्र, राजस्थानही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 3:14 AM

‘मोदीकेअर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या केंद्राच्या आयुषमान योजनेत सहभागी होण्यास सुरुवातीला तयार नसणा-या महाराष्ट्र आणि राजस्थाननेही आता सहभागी होण्याची इच्छा दर्शविली आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : ‘मोदीकेअर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या केंद्राच्या आयुषमान योजनेत सहभागी होण्यास सुरुवातीला तयार नसणा-या महाराष्ट्र आणि राजस्थाननेही आता सहभागी होण्याची इच्छा दर्शविली आहे. पूर्णपणे केंद्र सरकारकडून निधी देण्यात येत असलेल्या या आरोग्य विमा योजनेत ही दोन राज्ये सहभागी झाल्यानंतर आता मोदी केअरमध्ये सहभागी राज्यांची संख्या २७ वर पोहोचली आहे.केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र आणि राजस्थान यांनी या योजनेत सहभागी होण्यास सहमती दर्शविली आहे. हे दोन्ही राज्ये पूर्वीपासूनच आपल्या विमा योजनेंतर्गत आरोग्य विम्याचे कवच आणि अन्य लाभ देत आहेत. या राज्यांची अशी इच्छा होती की, त्यांच्या योजना केंद्राच्या पूर्ण अनुदानित योजनेत समाविष्ट कराव्यात. याबाबत दीर्घ चर्चेनंतर हे राज्ये केंद्राची योजना लागू करण्याबाबत सहमत झाले आहेत. नड्डा म्हणाले की, केंद्र सरकार ६४० जिल्ह्यांतील १०.७४ कोटी गरीब आणि आर्थिकदृष्ट्या असुरक्षित कुटुंबांना या योजनेंतर्गत पाच लाखांचे आरोग्य विम्याचे कवच देणार आहे. महाराष्ट्राने कें द्र सरकारला सांगितले की, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत राज्य २०१२ पासून २.२९ कोटी कुटुंबांना १.५० लाख रुपयांचे आरोग्य विम्याचे कवच देत आहे. त्याचप्रकारे राजस्थान २०१५ पासून भामाशाह आरोग्य विमा योजना ९२ लाख कुटुंबियांसाठी चालवीत आहे.महाराष्ट्रात मोदीकेअर योजनेचे लाभार्थी ८४ लाख कुटुंबे आणि राजस्थानात ४८ लाख कुटुंबे आहेत. महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की, केंद्र सरकारने या लाभार्थींची संख्या ८४ लाखांहून २.२९ कोटी करावी. त्याचप्रमाणे राजस्थानची अशी इच्छा आहे की, ४८ लाख कुटुंबांऐवजी केंद्र सरकारने १.३१ कोटी कुटुंबांना याचा लाभ द्यावा. मात्र, कें द्र सरकारचे असे मत आहे की, या दोन राज्यांना अपवाद केले जाऊ शकत नाही. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, २०११ च्या सामाजिक आर्थिक जातीच्या जनगणनेनुसार लाभार्र्थींची संख्या निश्चित केली जाईल. महाराष्ट्राची अशी समस्या आहे की, जर त्यांनी मोदीकेअर योजना लागू केली तर, उर्वरित १.४५ कोटी कुटुंबांना पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच केंद्राच्या मदतीशिवाय द्यावे लागेल. महाराष्ट्रवर हे मोठे आर्थिक ओझे होईल.ही योजना देशभरात कधी सुरू केली जाणार आहे? असा प्रश्न केला असता नड्डा म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी ही योजना एप्रिलमध्येच सुरू केली आहे. या योजनेच्या विस्ताराची निश्चित तारीख त्यांनी सांगितली नाही.>या राज्यांचा आहे विरोधपंजाब (काँग्रेस) आणि दिल्ली (आप) सरकारने अद्याप या योजनेत सहभागाबाबत औपचारिक सहमती दर्शविलेली नाही. या योजनेत सहभागाबाबत त्यांच्याशी सुरू असलेली चर्चा प्रगतिपथावर आहे.ओडिशा सरकारने ही योजना लागू करण्यास नकार दिलेला आहे. कारण या राज्यात पूर्वीपासूनच बिजू आरोग्य कल्याण योजना सुरू आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी