शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, हरयाणा यांनी वाढवली भाजपची चिंता; दिवाळीपूर्वी तीन राज्यांत विधानसभा निवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 13:54 IST

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक मोठे फेरबदल होण्याची शक्यता

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरयाणात झालेल्या लोकसभा निवडणुकांनी या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत सत्ताधारी भाजपची चिंता वाढवली आहे. ४ महिन्यांनी महाराष्ट्र, हरयाणात होणाऱ्या विधानसभा निवडणुका भाजपसाठी चिंतेचा विषय बनल्या आहेत. या दोन्ही राज्यांत भाजपची सरकारे आहेत. महाराष्ट्रात भाजप शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत सत्तेत आहे, तर हरयाणात दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीने साथ सोडल्याने तेथे अल्पमतातील भाजप सरकार आहे. भाजप दोन्ही राज्यांत संघर्ष करत आहे.

दोन्ही राज्यांत विजयाचा दावा करत भाजप सर्वकाही आलबेल असल्याचे दाखवत असला, तरी पक्ष नेतृत्वाला वास्तविकता कळून चुकली आहे. महाराष्ट्रात युतीतील घटक पक्षांविरुद्ध अधिक सत्ताविरोधी लाट असून, वाट्याला आलेल्या मतदारसंघात पक्ष चांगली कामगिरी करत असल्याचे भाजप मानतो.

महाराष्ट्र, हरयाणा जिंकण्यासाठी भाजप काहीही करायला तयार

  • महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांत विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप मोठे फेरबदल करू शकतो. दोन्ही राज्ये जिंकण्यासाठी भाजप काहीही करायला तयार आहे.
  • महाराष्ट्र, हरयाणा व झारखंडमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार असून, नोव्हेंबर महिन्यात तेथे नवीन सरकार सत्तारूढ होणार आहे, असे सूत्रांकडून कळते.

जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुका

  • प्रदीर्घ काळापासून राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन महिन्यांनंतर सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. जम्मू-काश्मीरमध्ये दि. ३० सप्टेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.
  • कलम ३७० हटविल्यापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. लोकसभा निवडणुकीत काश्मीर खोऱ्यात ५२ टक्के मतदान झाल्याने तेथील लोकांना मजबूत लोकशाही हवी असल्याची आशा निर्माण झाली आहे. याआधी काश्मीर खोऱ्यात केवळ ९ टक्के मतदान होत होते.
टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024HaryanaहरयाणाMaharashtraमहाराष्ट्रJammu Kashmirजम्मू-काश्मीर