शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Maharashtra Government: ''अजित पवार एकटेच पडतील, सुप्रिया सुळे होतील पवारांच्या उत्तराधिकारी''

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 9:14 AM

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

नवी दिल्लीः देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारचा भूकंपच आणला होता. शरद पवारांनी अजित पवारांना विधिमंडळ नेतेपदावरून हटवले. तसेच शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं भाजपा सराकरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आज त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत सांगितलं की, या राजकीय चढाओढीत अजित पवार एकटे पडणार आहेत. राष्ट्रवादीचे 54 पैकी 53 आमदार हे शरद पवारांसोबत आहेत. त्यामुळे अजित पवार हे एकटेच राहतील. तसेच पवारांच्या उत्तराधिकाऱ्यांची समस्याही सुटली आहे. सुप्रियाताईंना शुभेच्छा!!, दिग्विजय सिंह यांनी असं ट्विट केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये शरद पवारांच्या उत्तराधिकाऱ्यांवर वाद सुरू होता. त्याला अखेर पूर्णविराम मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तत्पूर्वी पक्षाचा विधिमंडळ सभासद किंवा कुठलाही प्रामाणिक कार्यकर्ता भाजपासोबत सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेत सहभागी राहणार नाही, याचा मला विश्वास वाटतो. अजित पवारांना समर्थन दिलेले आमदार काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या बैठकीला पोहोचले होते. त्या सर्वच आमदारांनी शरद पवारांवर विश्वास व्यक्त केला आहे. परंतु त्यातील पाच आमदार गायब असल्याचं नंतर नवाब मलिक म्हणाले होते. इतर राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. काल सकाळी शरद पवारांनी फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीची बातमी समजल्यानंतर सर्वात आधी उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘काळजी करू नका, मी सोबत आहे’ असा धीर दिला होता. तसेच सेनेचे आमदार सांभाळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी काही ज्येष्ठ विधिज्ञांशी सल्लामसलत केली. काँग्रेसच्या दिल्लीहून आलेल्या नेत्यांशीही संवाद साधला. सकाळी 9.30 वाजेपर्यंत प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे, सुनील तटकरे हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. अजित पवारांसोबत कोणकोण आहेत, याची खातरजमा करून त्या प्रत्येकाशी स्वत: पवारांनी संपर्क साधला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेDigvijaya Singhदिग्विजय सिंह