शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM: उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना फोन, शपथविधीचे दिले निमंत्रण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 00:18 IST

अनेक अडथळे पार करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे.

मुंबई - अनेक अडथळे पार करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे. आता गुरुवारी संध्याकाळी या आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, शिवाजी पार्कवर होणार हा शपथविधी अविस्मरणीय होण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रित केले आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. तसेच गुरुवारी होणाऱ्या शपथविधी समारंभासाठी त्यांना निमंत्रण दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले.

 

तसेच उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथविधीची अधिकृत निमंत्रणपत्रिकाही पाठवण्यात आली आहे. 

दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या या शपथविधी सोहळ्याला देशभरातील बड्या राजकीय नेत्यांना आणि काही सेलिब्रिटींनाही आमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना उद्याच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही आदित्य ठाकरे यांनी निमंत्रण दिले. निमंत्रण देण्यासाठी आज रात्री उशिरा आदित्य ठाकरे दिल्लीला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा