शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM:मोदी-शहा यांच्याकडून फडणवीसांचे अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 03:47 IST

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान मोदी यांनी एक टष्ट्वीट करून दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेते महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमित शहा यांनी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल अजित पवार यांचे मन:पूर्वक अभिनंदन. मला विश्वास आहे की, हे सरकार विकासाशी तसेच महाराष्ट्राच्या कल्याणाशी निरंतर बांधील राहील. तसेच राज्यात विकासाचा नवा मानक प्रस्थापित करील. भाजपाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे. नड्डा यांनी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, ‘मी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-एनसीपीचे सरकार महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जाईल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019