Maharashtra Election 2019 : सोनिया गांधी, राहुल, प्रियांकांच्या प्रचार सभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 05:42 IST2019-10-10T01:46:40+5:302019-10-10T05:42:04+5:30
सोनिया गांधी व शरद पवार यांची किमान संयुक्त सभा राज्यात होणार असल्याचे समजते.

Maharashtra Election 2019 : सोनिया गांधी, राहुल, प्रियांकांच्या प्रचार सभा
नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी बँकॉकला गेल्याची टीका विरोधकांनी सुरू केली असतानाच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह राहुल आणि प्रियांका गांधी यांचा प्रचार दौराच काँग्रेसने जाहीर केला आहे. या तिन्ही नेत्यांच्या १५ सभा राज्यात होणार आहेत.
प्रियांका गांधी यांची सभा १६ आॅक्टोबरला नांदेड येथे होणार आहे. सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या १५ सभा होणार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची १३ आॅक्टोबरला मुंबईत सभा होणार आहे.
प्रियांका पहिल्यांदाच महाराष्ट्रात प्रचारात उतरणार आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातील प्रचाराची धुरा सोनिया व राहुल गांधी यांनी सांभाळली. प्रियांकांच्या सभांना अधिक मागणी आहे. त्यांंची पहिली सभा नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी होईल. येथून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता.
सोनिया गांधी नागपुरात
सोनिया गांधी १४ व १५ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रात सभा घेतील. यातील एक नागपुरात होण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी व शरद पवार यांची किमान संयुक्त सभा राज्यात होणार असल्याचे समजते.