शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

Maharashtra Election 2019: लिंबू ठेवणं ही अंधश्रद्धा नव्हे, अर्थमंत्र्यांकडून राजनाथ सिंहांचे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 12:39 PM

Maharashtra Election 2019: राजनाथ सिंह यांनी राफेल विमानासमोर लिंबू ठेवले या मुद्द्यावर निर्मला सितारमण यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की,

पुणे - भारतीय हवाईदलाने मंगळवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिले राफेल लढाऊ विमान औपचारिकरीत्या स्वीकारले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राफेल विमानाची पूजा करण्यात आली होती. लढाऊ विमानाची पूजा करताना त्याच्या चाकांखाली लिंबू ठेवण्यात आल्याने विरोधकांसह सोशल मीडियावरुनही त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याचं स्पष्टीकरण माजी संरक्षणमंत्री आणि विद्यमान अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दिलंय. तसेच, ही श्रद्धा असून अंधश्रद्धा नसल्याचंही सितारमण यांनी म्हटलं.  

राजनाथ सिंह यांनी राफेलसमोर लिंबू ठेवले या मुद्द्यावर निर्मला सितारमण यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्यांनी ओम लिहिला त्यात काय चुकीचे आहे? ही अंधश्रद्धा आहे? प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार काम करतो. पूर्वीचे संरक्षणमंत्री आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या धर्म पद्धतीने देशासाठी संरक्षण सामुग्री ताब्यात घेताना पूजा केली होती, असे म्हणत ए.के.अँटोनी यांचे नाव न घेता त्यांनी काँग्रेसच्या काळातील संरक्षणमंत्र्यांची आठवण करून दिली. तसेच, तेव्हा कोणी काहीही केल नाही, चर्चाही केली नाही, असे सितारमण यांनी म्हटले. ज्यांचा विश्वास आहे ते करतात, विजयादशमीला शस्त्रपूजा ही आपली संस्कृती आहे. त्यांनी परंपरा पाळली, त्यात काही चुकीचे नाही, असे म्हणत राजनाथसिंह यांच्या राफेल पूजनाचे आणि लिंबू ठेवण्याचे सितारमण यांनी समर्थन केलं आहे. कलम 370 हा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा मुद्दा कसा होऊ शकतो का याबाबतही त्या म्हणाल्या की, हा देशाच्या सुरक्षिततेसाठी अतिमहत्वाचा मुद्दा आहे. फक्त महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशासाठी महत्वाचा आहे.प्रत्येक भारतीयाला त्याबद्दल अभिमान हवा. हा निर्णय झाल्यावर जम्मू आणि काश्मीरमध्ये तिथे एकही गोळी चालली नाही. तेथील वातावरण सुरळीत आहे. मात्र, आम्ही बेरोजगारी, आर्थिक मुद्दे याबाबतीतही तितकेच गंभीर आहोत. या दोन मुद्द्यांची बरोबरी होऊ शकत नाही. हा मुद्दा महाराष्ट्राच्या जाहीरनाम्यात कोणी घेतला, हे मला माहिती नाही, असेही त्यांनी म्हटले. 

दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांनीही या लिंबाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले की, भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात नवीन लढाऊ विमान दाखल झाल्याचा मला आनंद आहे. मात्र जेव्हा राफेल खरेदी केले तेव्हा विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवण्यात आले. मी जर एखादी नवीन गाडी घेतली असती तर लिंबू कापून त्याचे सरबत बनवून लोकांना पाजलं असतं असं सांगत सरकारच्या या कृतीवर निशाणा साधला.  

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRajnath Singhराजनाथ सिंहRafale Dealराफेल डीलDefenceसंरक्षण विभागAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019