शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना संकटमोचन मंदिराचे महंत देणार आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 13:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून लढणार याची भाजपाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता विरोधी पक्षांनी त्यांना घेरण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.  

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून लढवणार आहेत हे आता निश्चित झाले आहे. दरम्यान, मोदी वाराणसी येथून लढणार याची भाजपाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता विरोधी पक्षांनी त्यांना घेरण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.  या रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेसकडून मोदींविरोधात स्थानिक लोकप्रिय चेहरा मैदानात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदींविरोधात संकटमोचन मंदिराचे महंत प्राध्यापक विश्वंभर नाथ मिश्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच मिश्रा यांना सपा आणि बसपाकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यावर ते वाराणसीवासीयांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले होते. आपण देशाचा पंतप्रधान निवडणार असल्याने वाराणसीमधील मतदारांमध्ये उत्सुकता होती. मात्र त्यावेळीही अरविंद केजरीवाल यांनी मोदींना आव्हान दिल्याने लढत तुल्यबळ झाली होती.  बनारस हिंदू विद्यापीठातील प्राध्यापक विश्वंभर नाथ मिश्रा यांची प्रतिमा सर्वधर्मसमभाव मानणारे अशी आहे.  समाजातील प्रत्येक वर्गामध्ये त्यांचा संपर्क आहे. तसेच गंगेच्या स्वच्छतेबाबत सुरू असलेल्या मोहिमेमध्ये प्राध्यापक विश्वंभर नाथ मिश्रा हे अग्रणी राहिले आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणारा का अशी विचारणा केली असता त्यांनी चर्चा तर मीसुद्धा ऐकत आहे. पण मी सध्यातरी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा केलेली नाही, असे सांगितले.    

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसीBJPभाजपाcongressकाँग्रेस