शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षापूर्वी भारतात आली अन् हिंदू संस्कृतीच्या प्रेमात पडली; कोण आहे ही साध्वी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:21 IST

मागील ३० वर्षापासून ती ऋषिकेश  येथील परमार्थ निकेतन आश्रमात राहतेय.

प्रयागराज - सध्या देशात महाकुंभ २०२५ मेळा उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथं सुरू आहे. त्यात सोशल मीडियावर हर्षा रिछारिया नावाच्या तरुणीने चांगलीच हवा केली आहे. हर्षा एक सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे. गेल्या २ वर्षापासून ती साध्वी बनली आहे. गुरू आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशानंद गिरी महाराज आणि निरंजनी आखाडाशी हर्षा जोडली गेली आहे. परंतु हर्षासारखीच आणखी एक महिला साध्वी तिच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध झाली आहे तिचं नाव आहे भगवती सरस्वती.

साध्वी भगवती सरस्वती मूळची लॉन्स एंजिल्समध्ये राहणारी आहे. तिने स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीतून पदवीचं शिक्षण घेतले. मागील ३० वर्षापासून ती ऋषिकेश  येथील परमार्थ निकेतन आश्रमात राहतेय. अलीकडेच ती प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यात पोहचली. साध्वी भगवती सरस्वती सांगतात की, संगममध्ये पवित्र स्नान करण्याची ही संधी नाही तर त्यांच्या भक्तीत श्रद्धेची डुबकी लावण्याची संधी आहे. ही भारतीय संस्कृती आणि वारसा याची महानता दाखवते. हा कुठलाही रॉक कॉन्सर्ट अथवा कुठल्याही खेळाचे आयोजन नाही असं त्यांनी सांगितले.

१९९६ मध्ये भारतात आली...

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात साध्वी भगवती सरस्वती यांचा जन्म झाला. १९९६ साली भारतात पर्यटनासाठी आलेल्या भगवती यांच्यावर भारतीय संस्कृती आणि इथल्या प्रथा परंपरेचे छाप पडली. त्या इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी वयाच्या ३० व्या वर्षी घर कुटुंब सोडून सन्यास ग्रहण करण्याचा निर्णय घेतला. ऋषिकेशच्या गंगा किनारी असलेल्या परमार्थ निकेतन आश्रमात त्यांनी आश्रय घेतला. भगवती सरस्वती यांनी मानसोपचारात पीएचडी धारण केलं आहे. त्या डिवाइन शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत त्याशिवाय ऋषिकेश इथं महिला सशक्तीकरणाचं त्या काम करतात. 

दरम्यान, अमेरिकेतून भारतात येण्यापूर्वी त्यांना अमेरिका आणि भारतीय लोकांच्या मानसिकतेत मोठं अंतर दिसले. अमेरिकेतली लोक तक्रारी जास्त करतात, प्रत्येकजण तक्रारच करत राहतो मग ते पैशाचं प्रकरण, आरोग्याशी निगडीत विषय असो..भारत त्यापेक्षा वेगळा आहे. इथले लोक परामात्मावर भरवसा ठेवतात. तक्रारीपासून लांब राहतात असंही साध्वी भगवती सरस्वती यांनी म्हटलं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश