शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

गंगा स्नानावरून मल्लिकार्जुन खर्गेंचा निशाणा, आता भाजपनं दिलं खुलं आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 21:06 IST

आता भाजप खासदार आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना लक्ष्य करत आव्हान दिले आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील महू येथे 'जय बापू, जय भीम, जय संविधान' रॅलीला संबोधित केले. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप नेत्यांवर गंगास्नान करण्यावरून निशाणा साधला. "गंगा नदीत डुबकी मारून गरिबी धूर होणार नाही," असे खर्गे यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांचे हे विधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्या कुटुंबासह कुंभस्नानासाठी प्रयागराज येथे गेलेले असतानाच आले आहे. यानंतर, आता भाजपने त्यांच्य या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे. भाजप खासदार आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना लक्ष्य करत आव्हान दिले आहे.

संबित पात्रांनी दिलं असं आव्हान -मल्लिकार्जुन खर्गे यांना प्रत्युत्तर देताना भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हटले, "महाकुंभ लाखो वर्षांपासून श्रद्धेचे प्रतीक आहे. जगभरात भक्तीचा भाव आहे. असे असताना, एक राजकीय पक्ष त्याची खिल्ली उडवतो." आज खर्गे जे काही बोलले, ते अत्यंत वेदनादायक आहे. ते म्हणाले, "डुबकी मारल्याने गरिबी दूर होईल का? मी खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका यांना आव्हान देतो की, ते इतर कुठल्याही धर्माच्या श्रद्धेसंदर्भात, असे बोलू शकतात का? हजारो लोक हजला करण्यासाठी जातात. आम्ही सन्मान करतो." 

"राहुल गांधींनी इटलीच्या स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारावी, पण..." - पात्रा पुढे म्हणाले, "या प्रकारचे विधान लज्जास्पद आहे. खर्गेजींनी सनातनविरुद्ध बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ते म्हणाले होते की, सत्तेत आल्यास सनातन नष्ट करू. राहुलजी आपण इटलीत जा आणि स्विमिंग पूलमध्ये भरपूर डुबक्या मारा पण माता गंगेसंदर्भात असे भाष्य करू नका. आमच्यासाठी गंगा केवळ नदी नाही, तर माता आहे." 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपा