शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

महाआघाडीचा प्रयोग फसला, भाजपची रणनीती यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 5:14 AM

अतिआत्मविश्वास नडला : सपा-बसपाची राजकीय खिचडी शिजली नाही

लखनऊ : उत्तर प्रदेशमधून भाजपला उखडून फेकण्याच्या संकल्पातून स्थापन झालेल्या सपा-बसप-रालोद आघाडीला अपेक्षेपेक्षा कमीच यश मिळाले. प्रदेशातील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी कमीत कमी ६० जागा जिंकण्याची आशा आघाडीस होती. ती केवळ १५ जागा मिळाल्याने धुळीस मिळाली. राजकीय तज्ज्ञांच्या अंदाजे आघाडीला अतिआत्मविश्वास नडला. भाजपच्या भक्कम रणनीतीमुळे राजकीय खिचडी शिजू शकली नाही.

मतदानाच्या टक्केवारीचा हिशेब पाहता सपा-बसप-रालोद आघाडीचा प्रयोग अगदी अपयशी सिद्ध झाला. एकमेकांची मते मिळविण्याचा दावा करणाऱ्या सपा आणि बसपच्या मतांची टक्केवारी वाढण्याऐवजी घटली.निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सपाला २२.३५ टक्के मते मिळाली होती. तो आकडा घटून १७.९६ टक्क्यांवर आला. गेल्या वेळी बसपला १९.७७ टक्के मते मिळाली होती, ती यंदा १९.२६ टक्क्यांवर आली. रालोदची स्थिती ५ वर्षांपूर्वी जशी होती, तशीच आजही आहे. एकही जागा दोन्ही निवडणुकांमध्ये या पक्षाला मिळाली नाही. मात्र मतांची टक्केवारी ०.८६ वरून १.६७ टक्क्यापर्यंत वाढली.तसे पाहता आघाडी बसपसाठी लाभदायक ठरली. २०१४ मध्ये एकही जागा न मिळालेला हा पक्ष यंदा मात्र मतांची टक्केवारी घटूनही यशस्वी ठरला. यंदा बसपला १० जागांवर यश मिळाले. तर समाजवादी पक्षाला गेल्या वेळी असलेल्या ५ जागा राखत आनंद मानावा लागला. वरिष्ठ नेता शिवपाल सिंह यादव यांची नाराजी आणि स्वतंत्रपणे पक्ष स्थापन करून निवडणूक लढविण्यामुळे सपाचे नुकसान झाले.

राजकीयविश्लेषक प्रा. बद्री नारायण यांच्या मते आघाडी अपयशी ठरण्याची अनेक कारणे आहेत. सपा-बसप-रालोद आघाडीला यादव, मुस्लीम आणि जाट मतदारांच्या हक्काच्या मतांवर किल्ला जिंकू, असा विश्वास होता. मात्र भाजप ओबीसीमधील विविध जातींची एकजूट करत आघाडीवर मात करण्यासाठी बारकाईने काम करत आहे, याचा पत्ताच या आघाडीच्या नेत्यांना लागला नाही.अनेक छोट्या दलित जातींची मते अधिकतर भाजपच्या पदरात पडली. भाजपने या जातींना सरकारी योजनांशी जोडले. त्यामुळे या जातींमध्ये आशादायकता निर्माण झाली.अन्य एक राजकीय तज्ज्ञ परवेज अहमद यांच्या मते महाआघाडी केवळ मायावती आणि अखिलेश यांच्यातच झाली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मनाने एकत्र येऊ शकले नाहीत.
मायावतींकडून आभार; अखिलेश विचारमंथनातबसपप्रमुख मायावती यांनी संभाव्य आघाडीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र सपाकडून त्याबद्दल ठाम बाब समोर आलेली नाही. मायावती निकालानंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या की, सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि रालोदप्रमुख चौधरी अजित सिंह यांनी पूर्ण प्रामाणिकपणा आणि निष्ठेने आघाडीचे उमेदवार निवडून यावेत यासाठी जीवापाड प्रयत्न केले. त्यासाठी आपण त्यांचे आभार मानतो, तर दुसरीकडे सपा विचारमंथनात गढली आहे. या पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, अखिलेश यादव यांनी शुक्रवारी पक्षाच्या नेत्यांसह बैठक घेतली. निकालांचा आढावा घेतला.