शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

किन्नर अखाड्याची मोठी अ‍ॅक्शन, ममता कुलकर्णी-लक्ष्मी नारायण यांना महामंडलेश्वर पदावरून हटवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:18 IST

किन्नर आखाड्याला लवकरच एक नवीन आचार्य महामंडलेश्वर मिळेल. तसेच, आखाड्याची नव्याने पुनर्रचना करण्यात येईल, असे ऋषी अजय दास यांनी म्हटले आहे...

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान, किन्नर आखाड्याने एक मोठी कारवाई केली आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवले असून तिला आखाड्यातूनही बाहेर काढले आहे. याशिवाय, लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वरपदावरून हटवून, आखाड्यातून काढून टाकण्यात आले आहे. किन्नर आखाड्याला लवकरच एक नवीन आचार्य महामंडलेश्वर मिळेल. तसेच, आखाड्याची नव्याने पुनर्रचना करण्यात येईल, असे ऋषी अजय दास यांनी म्हटले आहे.

ममता कुलकर्णीला 'श्री यमाई ममता नंद गिरी' असे नावही देण्यात आले होते -माजी अभिनेत्री ममता कुलकर्णीने गेल्या काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात सन्यासाची घोषणा केली होती. ममताने महाकुंभमेळ्यादरम्यान किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी  यांची भेट घेतली होती. यानंतर, तिने संगमावर पिंडदानाचा विधीगी केला होता. महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतल्यानंतर, ममता कुलकर्णीला 'श्री यमाई ममता नंद गिरी' असे नावही देण्यात आले होते. याच बरोबर तिची किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती.

महामंडलेश्वर बनवण्यावरून वाद -ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर बनवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यावरून संत मंडळी निषेधही नोंदवत होते. एवढेच नाही तर, बाबा रामदेव यांनीही ममताला महामंडलेश्वर बनवण्यावर प्रश्न उपस्थित केला होता. कालपर्यंत सांसारिक सुखांमध्ये रमलेले काही लोक एकाच दिवसात संत बनले आणि महामंडलेश्वरसारखी उपाधीही मिळाली, असे रामदेव यांनी म्हटले होते.

याशिवाय, किन्नर अखाड्याचे संस्थापक अजय दास यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एका महिलेला किन्नर अखाड्याचे महामंडलेश्वर बनवणे, हे सिद्धांतांना धरून नाही.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशBaba Ramdevरामदेव बाबा