कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी हर्षा रिछारिया, ग्लॅमरस फोटोंवरून ट्रोल होताच म्हणाली, "मी अजूनही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:37 IST2025-01-14T16:35:45+5:302025-01-14T16:37:01+5:30
Maha Kumbh 2025: अलिकडेच हर्षा रिचारियाला तिच्या जुन्या फोटोंवरून ट्रोल करत युजर्सनी तिच्या पूर्वीच्या जीवनशैलीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावरून हर्षाने प्रतिक्रिया दिली आहे.

कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी हर्षा रिछारिया, ग्लॅमरस फोटोंवरून ट्रोल होताच म्हणाली, "मी अजूनही..."
महाकुंभ अथवा कुंभमेळा २०२५ मध्ये, देश आणि जगभरातून लाखो भाविक पवित्र स्नान करण्यासाठी संगमावर पोहोचले आहेत. यावेळी निरंजनी आखाड्याची कथित साध्वी हर्षा रिचारियानेही स्नान केले आणि आपल्या यात्रेसंदर्भात भाष्य केले. हर्षा म्हणाली, गंगा-संगमात स्नान करणे हा एक अतिशय महत्त्वाचा अनुभव आहे, जो प्रत्येक भारतीयासाठी विशेष आहे. हे स्नान आमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि या संधीचा फायदा घेतल्याबद्दल मला अभिमान वाटतो."
अलिकडेच हर्षा रिचारियाला तिच्या जुन्या फोटोंवरून ट्रोल करत युजर्सनी तिच्या पूर्वीच्या जीवनशैलीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावरून हर्षाने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “मी लहानपणापासूनच साध्वी असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. मी अजूनही साध्वी नाही. मी या दिशेने वाटचाल करत आहे. सोशल मीडिया आणि लोकांनी मला साध्वी हर्षाचा टॅग दिला."
हर्षा एबीपी न्यूजसोबत बोलताना पुढे म्हणाली, "मी पुन्हा पुन्हा स्पष्ट करते की साध्वी असणे ही एक मोठी गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला साध्वी बनवण्यासाठी अनेक परंपरा, अनेक विधी करून घ्यावे लागतात. मी काहीही केलेले नाही, मी केवळ मंत्रदीक्षा घेतली आहे आणि ती कोणीही घेऊ शकते. जी गृहस्त जीवनातही घेतली जाऊ शकते. मी पूर्वी एक एंटरटेनर होते. मात्र आता मी माझ्या आयुष्यासाठी हा नवीन मार्ग निवडला आहे आणि मला त्यात काहीही चुकीचे वाटत नाही."
जुने फोटो डेलीट न करण्याचाही खुलासा केला -
माझे जुने फोटो बघितले जात आहेत... मी सांगते की, मी अँकरिंग क्षेत्रातूनच आले आहे. यात काय अडचण आहे? प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो, जुने आयुष्य असते. मी माझे सर्व जुने व्हिडिओ आणि फोटो डेलीटही करू शकले असते. पण मी ते केले नाही. कारण मला माझा प्रवास तरुणांसमोर मांडायचा आहे की, जर मी एवढा प्रवास करू शकले, तर मला वाटते, कोणीही हे करू शकते," अशेही हर्षाने म्हटले आहे.