चुंबकीय प्रभाव असणारे ठिकाण मॅग्नेटिक हिल
By Admin | Updated: January 17, 2017 05:35 IST2017-01-17T05:35:06+5:302017-01-17T05:35:06+5:30
काश्मीरच्या लेह सिमेजवळ मॅग्नेटिक हिल हे चुंबकीय प्रभाव असणारे ठिकाण आहे.

चुंबकीय प्रभाव असणारे ठिकाण मॅग्नेटिक हिल
काश्मीरच्या लेह सिमेजवळ मॅग्नेटिक हिल हे चुंबकीय प्रभाव असणारे ठिकाण आहे. कोणी या ठिकाणाला चमत्कार समजतात. डोंगररांगात साधारणत: वाहून घसरु नये म्हणून गिअर टाकून उभा केले जाते. पण, येथे वाहन न्यूट्रलमध्ये उभे केले तरी ते खाली घसरत नाही. उलट हे वाहन वरच्या बाजूला हळूहळू सरकू लागते. वैज्ञानिकांच्या मतानुसार, या भागात एक चुंबकीय ताकद आहे. ही ताकद मोठ्या भागाला प्रभावित करते. या भागातून विमान जाताना विमानात हलके धक्के जाणवतात, असे पायलटनेच सांगितले आहे. त्यामुळे या भागातून जाताना पायलट विमानाची गती वाढवतात. जेणेकरुन चुंबकीय क्षेत्राचा विमानावर प्रभाव पडू नये. एकूणच काय तर येथे गुरुत्वाकर्षाचे नियम लागू पडत नाहीत. काही वैज्ञानिकांचा असा दावा आहे की, हा दृष्टि भ्रम आहे. कारण, या डोंगरी भागाचा जो खालचा भाग दिसतो तो वस्तुत: वरचा भाग आहे आणि जो वरचा भाग दिसतो तो खालचा भाग आहे. त्यामुळेच येथे वाहन उभे केले असता ते वरच्या भागात जाताना दिसते. अर्थात, हे सर्व दावे - प्रतिदावे आहेत. याचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर मॅग्नेटिक हिलची सफर करायला हवी.