आणखी चार राज्यांत मॅगी नापास!

By Admin | Updated: June 5, 2015 01:59 IST2015-06-05T01:59:24+5:302015-06-05T01:59:24+5:30

नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्सचे नमुने सदोष आढळल्यानंतर केरळ, दिल्लीपाठोपाठ गुरुवारी तामिळनाडू, गुजरात, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांनीही मॅगीवर तात्पुरती बंदी लादली.

Magee no more in four states | आणखी चार राज्यांत मॅगी नापास!

आणखी चार राज्यांत मॅगी नापास!

नवी दिल्ली : नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्सचे नमुने सदोष आढळल्यानंतर केरळ, दिल्लीपाठोपाठ गुरुवारी तामिळनाडू, गुजरात, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांनीही मॅगीवर तात्पुरती बंदी लादली. याचदरम्यान मॅगी नूडल्स आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आढळल्यास नेस्ले इंडिया आणि मॅगीची जाहिरात करणाऱ्यांविरुद्ध निश्चितपणे कारवाई केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी दिली.
तामिळनाडू व उत्तराखंड सरकारने तीन महिन्यांसाठी तर गुजरात आणि जम्मू-काश्मीर सरकारने मॅगी नूडल्सच्या व्रिकीवर एक महिन्याची बंदी लादली आहे. मॅगीवर बंदी लादणाऱ्या यादीत उत्तराखंडचाही समावेश झाला आहे. गुजरातमध्ये नमुन्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक शिसे आढळले. उत्तराखंडात मॅगी नूडल्सच्या ३०० नमुन्यांपैकी दोन नमुने तपासणीत ‘फेल’ ठरले. यानंतर मॅगीच्या उत्पादनावर बंदी जाहीर करण्यात आली. उत्तराखंडातील प्रयोगशाळेत तपासलेल्या दोन नमुन्यांमध्ये अधिक मोनोसोडियम ग्लूटामेट आढळले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

च्तामिळनाडू सरकारने नेस्ले कंपनीच्या मॅगीसह, वाय वाय एक्स्प्रेस नूडल्स, रिलायन्स सिलेक्ट इन्स्टंट नूडल्स तसेच स्मिथ अ‍ॅण्ड जॉन्स चिकन मसाला नूडल्सची विक्री, साठवणूक आणि उत्पादनावर तीन महिन्यांची बंदी लादली. या सर्व ब्रॅण्डच्या नूडल्समध्ये नमुन्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक शिसे आढळून आल्याचे तामिळनाडू सरकारने स्पष्ट केले.
च्गुजरातेत मॅगीशिवाय एस.के. फूड्सच्या नूडल्सचाही प्रत्येकी एक नमुना तपासला. यात शिसे प्रमाणापेक्षा अधिक (४ पीपीएम) आढळल्यानंतर एस.के. फूड्सच्या नूडल्सच्या विक्रीवरही एक महिन्याची बंदी लादण्यात आली आहे.

मॅगी नूडल्स प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्रालय जी काही कारवाई करेल, ती तथ्यांवर आधारित असेल. कायद्याच्या चौकटीतच ही कारवाई केली जाईल. - जितेंद्र सिंह, केंद्रीय मंत्री

Web Title: Magee no more in four states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.