शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

आता हेल्मेट नाही तर दारू नाही! अपघात रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचा नवा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 12:18 IST

रस्ते अपघात रोखण्यासाठी नाना प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

जबलपूर : रस्ते अपघात रोखण्यासाठी नाना प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. हेल्मेट सक्तीचा निर्णय देखील त्याचाच एक भाग आहे. मात्र आता रस्ते अपघात रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आणखी एक उपाय काढला आहे. त्यामुळे लोकांना जरी त्यांच्या जीवाची पर्वा नसली तरी दारू विक्रेत्या दुकानदाराला काळजी घ्यावी लागणार आहे. खरं तर हेल्मेट नसेल तर दारू घेता येणार नाही असा निर्णय उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. आता हेल्मेट घालणाऱ्यांनाच जबलपूरमध्ये दारू मिळणार आहे. हेल्मेट नसेल तर दारू मिळणार नाही. या आदेशाची अंमलबजावणीही तातडीने सुरू झाली आहे.

वाहनांचे अपघात कमी करण्यासाठी जबलपूर उच्च न्यायालयाने मध्य प्रदेशसरकारला दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश दिले होते. शासनाने देखील याची दखल घेत आदेश दिले असून वाहतूक पोलिसांकडूनही हेल्मेट घालण्याची जोरदार मोहीम राबवली जात आहे. मात्र वाहनचालक याच्याकडे कानाडोळा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता उत्पादन शुल्क विभागाने दोन पावले पुढे जाऊन नवा आदेश काढला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

आदेशात म्हटले...उत्पादन शुल्क विभाग जबलपूर यांनी दारू दुकान चालकांना आदेश देऊन ही बाब कळवली आहे. लक्षणीय म्हणजे हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकांना दारू देऊ नये, असे सांगण्यात आले आहे. दुकानाच्या बाहेर बॅनर पोस्टर्स लावून ग्राहकांनी याबाबतची माहिती द्यावी. हेल्मेटशिवाय वाहनचालकांना दारू दिली जाणार नाही, ही सूचना कळवावी. असे या आदेशात म्हटले असून याची अमंलबजावणी सुरू झाली आहे. दुकानदारांनी आता बॅनर पोस्टर्स लावले आहेत. त्यामुळे आता मद्यप्रेमींना हेल्मेट असल्याशिवाय दारू खरेदी करता येणार नाही. 

आता हेल्मेट नाही तर दारू नाहीउत्पादन शुल्क विभागाचे म्हणणे आहे की, बहुतांश अपघात हे मद्यधुंद वाहनचालकांमुळे होतात. हेल्मेटचा वापर न करता मद्यपान करून वाहने चालवून लोक आपला व इतरांचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे आता हेल्मेटशिवाय दारू खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या या नव्या उपक्रमाला दारूच्या दुकानात काम करणारे कर्मचारी सहकार्य करत आहेत. हेल्मेटशिवाय येणाऱ्या ग्राहकांना दारू देण्यास ते नकार देत आहेत. दररोज होणारे अपघात टाळण्यासाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली तर नक्कीच त्याचे चांगले परिणाम होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशExcise Departmentउत्पादन शुल्क विभागjabalpur-pcजबलपुरGovernmentसरकार