अंगावर शहारा आणणारा VIDEO; कारला फरफटत घेऊन गेला ट्रक, आत बसलेले लोक थोडक्यात बचावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 19:47 IST2021-11-13T19:46:40+5:302021-11-13T19:47:59+5:30
या कारमध्ये चार जण बसलेले होते. ते थोडक्यात बचावले. ही संपूर्ण घटना तेथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अंगावर शहारा आणणारा VIDEO; कारला फरफटत घेऊन गेला ट्रक, आत बसलेले लोक थोडक्यात बचावले!
रायसेन - मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रायसेन जिल्ह्यात ट्रक चालकाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. ट्रक चालकाने अल्टो कारला धडक दिली. यानंतर त्याने ट्रक थांबवता नाही, तर कार ढकलत समोर बरेच दूर नेली. या कारमध्ये चार जण बसलेले होते. ते थोडक्यात बचावले. ही संपूर्ण घटना तेथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Road acciden the truck dragged the car)
ही घटना जिल्ह्यातील सिल्वणीनगरमधील सर्वात वर्दळीच्या बजरंग चौकातील आहे. साईंखेडा येथून सिल्वाणीकडे येणाऱ्या एका ट्रकने (एमपी 21 H 0 958) पांढऱ्या रंगाच्या अल्टो कारला (एमपी 49 सी 3818) धडक दिली आणि तिला ढकलत पुढे नेले. यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
भयंकर...! कारला फरफटत घेऊन गेला ट्रक, आत बसलेले लोक थोडक्यात बचावले#truckcaraccident#roadaccidentpic.twitter.com/VWINTmFSZ1
— Lokmat (@lokmat) November 13, 2021
सांगण्यात येते, की अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी दोन्ही वाहने सिल्वणी पोलीस ठाण्यात नेली. येथे ट्रकचालक पप्पू राजपूत विरुद्ध 279 अन्वये गुन्हा दाखल करत निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.