शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मध्य प्रदेश, राजस्थानात मतदानाआधीच काँग्रेस नेत्यांमध्ये खुर्चीसाठी खेचाखेची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 13:58 IST

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांमध्ये खुर्चीसाठी खेचाखेची सुरू झाली आहे.

जयपूर - मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सत्तेत पुनरागमन करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. मात्र दोन्ही राज्यांमध्ये प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांमध्ये खुर्चीसाठी खेचाखेची सुरू झाली आहे. एकीकडे मध्य प्रदेशात काँग्रेस पक्ष दिग्विजय सिंह आणि कमलनाथ या ज्येष्ठ नेत्यांच्या गटांमध्ये विभागला गेला असून, युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे सत्तास्पर्धेत पिछाडीवर पडले आहेत. तर राजस्थानमध्ये ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर करून युवा सचिन पायलट यांच्यासोबत आपणही सत्तास्पर्धेत सामील असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानापूर्वी काँग्रेससमोरील अडचणी काही प्रमाणात वाढण्याची चिन्हे आहेत. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असले तरी पक्षातील विविध गटांमधील मतभेद अनेकदा उघड झाले आहेत. काही दिवसांपूर्वी दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात राहुल गांधी यांच्यासमोरच जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतरही राज्यात पक्ष कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे, आणि दिग्विजय सिंह अशा तीन नेत्यांच्या गटात विभागला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिग्विजय सिंह यांनी आपण मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नसल्याचे सांगत पक्षाची चिंता काहीशी दूर केली असली तरी राज्यातील विविध भागात आपल्या गटाच्या 75 उमेदवारांना तिकीट मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.  तर कमलनाथ आणि शिंदे यांच्या गटातील प्रत्येकी 45-45 उमेदवारांना तिकीट मिळाले आहे. तर अजय सिंह आणि सुरेश पचौरी यांच्या गटांना 10 ते 15 ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे. मात्र दिग्विजय सिंह यांचे निकटवर्तीय असलेल्या सत्यव्रत चतुर्वेदी आपल्या मुलाला उमेदवारी मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे राज्यात दिग्विजय आणि कमलनाथ या अनुभवी मंडळींसमोर ज्योतिरादित्य शिंदे यांना संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.  दुसरीकडे राजस्थानमध्ये काँग्रेस भाजपाकडून सत्ता खेचून घेणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे इथेही मुख्यमंत्रिपदासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी सुरू आहे. राजस्थानमध्ये ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी ते आणि सचिन पायलट विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने चर्चांना उत आला आहे.  राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. मात्र दोन्ही नेत्यांनी आतापर्यंत याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. मात्र त्यांच्या समर्थकांकडून यासंदर्भात दावे केले जात आहे.  तसेच गहलोत यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने मुख्यमंत्रिपदासाठी सचिन पायलट यांच्यासमोर आव्हान उभे राहिल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्या सक्रियतेमुळे पक्षातील अंतर्गत समीकरणे भक्कमली आहेत. त्यांची उपस्थिती विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरेल, असेही मानले जात आहे. तसेच राजस्थानमध्ये अशोक गहलोत मैदानात नसल्याने पक्षाला नुकसान होऊ शकते, अशी माहिती काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहोचवण्यात आली आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक