शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
5
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
6
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
7
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
9
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
10
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
11
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
12
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
13
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
14
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
15
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
16
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
17
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
18
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
19
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

विहिरीतील घाण साफ करायला उतरले, गाळात अडकून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 22:15 IST

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर.

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. कुंदावत गावात विहिरीतील गाळ काढण्यासाठी उतरलेल्या आठ जणांचा गाळात अडकून मृत्यू झाला. माहिती मिळताच खंडवा एसपी, जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सर्वांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीनिमित्त गावकऱ्यांनी गावात गणगौर मातेच्या मूर्तीची स्थापना केली होती. नवरात्रीनंतर गणगौर मातेच्या मूर्तीचे विसर्जन करायचे होते. त्यामुळे आज विहिरीची स्वच्छता करण्याचा विचार ग्रामस्थांनी केला. विहीर स्वच्छ करण्यासाठी काहीजण उतरले होते. पहिले तीन जण गाळात बुडाले, त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य पाच जणांचाही बुडून मृत्यू झाला. 

हा प्रकार पाहून ग्रामस्थांनी तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच छायगावमाखान पोलीस ठाण्यासह रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जिल्हाधिकारी ऋषव गुप्ता, एसपी मनोज कुमार राय, एसडीएम बजरंग बहादूर सिंहही घटनास्थळी पोहोचले. पोलिस-प्रशासनाच्या पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. विहिरीत दलदल आणि कचऱ्यामुळे तयार झालेल्या विषारी वायूमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

आर्थिक मदत जाहीरया अपघातात राकेश (21), वासुदेव (40), अर्जुन (35), गजानन (35), मोहन(माजी सरपंच, 48), अजय (25), शरण (37) आणि अनिल (25) यांचा मृत्यू झाला. खंडवाचे जिल्हाधिकारी ऋषभ गुप्ता यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आणि सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिस