शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh: मध्य प्रदेशच्या बेटी बचाओ मोहिमेला धक्का, मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 06:45 IST

Madhya Pradesh: एनसीआरबीच्या अहवालानुसार, मध्य प्रदेशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याचे पुढे आले असून, यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.

- अभिलाष खांडेकरभोपाळ : एनसीआरबीच्या अहवालानुसार, मध्य प्रदेशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याचे पुढे आले असून, यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.

संपूर्ण राज्यात मामा म्हणून ओळख असलेले मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यावर माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी टीकास्त्र सोडले आहे. राज्यात अनेक वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून ‘बेटी बचाओ’ मोहीम सुरू करण्यात आली होती. तसेच या मोहिमेचे ते श्रेय घेत होते. तथापि, नव्याने जारी करण्यात आलेल्या एनसीआरबी अहवालात मध्य प्रदेश बेपत्ता मुलींच्या राज्यांच्या यादीत सर्वात वर आहे. २०२१मध्ये १८ वर्षांवरील ९,४०७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल (८,४७८) व तामिळनाडू (४,९१४) यांचा क्रमांक आहे. 

देशभरात ५४,९६२ अल्पवयीन मुली मानवी तस्करीला बळी पडतात किंवा शारीरिक छळाला बळी पडतात. मध्य प्रदेशात २०२०मध्ये म्हणजेच कोरोनाच्या कालावधीत ही संख्या ७,२३० होती. २०१९मध्ये ही संख्या ८,५७२ होती. 

 १७ टक्के बेपत्ता मुली   मध्य प्रदेशातीलदेशातील एकूण बेपत्ता मुलींपैकी१७ टक्के मुली राज्यातील असल्याचे तथ्य पुढे आले असून, यामुळे मध्य प्रदेशातील भाजपशासित राज्याचे दावे पोकळ ठरले आहेत. ‘लोकमत’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने सुरू करणार आहेत.

सुशासनाचा दावा पोकळ - कमलनाथकमलनाथ यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारचा सर्व स्तरांवरील सुशासनाचा दावा एनसीआरबीच्या अहवालाने खोटा ठरला आहे. प्रत्येक तीन तासांनी निरपराध अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत असून, हे निषेधार्ह आहे. कमलनाथ यांनी ट्वीटमध्ये भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, राज्यात एससी, एसटी समुदायावरील अत्याचार वाढले आहेत. मुली बेपत्ता हाेण्याच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात आघाडीवर आहे. भाजपला मोठ्या प्रमाणावर मते देणाऱ्या दोन समुदायांच्या विरोधातील गुन्हे ९.३८ टक्क्यांनी वाढले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश