शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : अवघ्या चार महिन्यांतच मतदाराने काँग्रेसला नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 04:56 IST

चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात लोकसभा मतदार संघनिहाय १७ जागांवर आघाडीवर असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकालात तब्बल २८ जागांवर मुसंडी मारत काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे.

- गजानन चोपडेचार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात लोकसभा मतदार संघनिहाय १७ जागांवर आघाडीवर असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकालात तब्बल २८ जागांवर मुसंडी मारत काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. २०१४ मध्ये २९ पैकी दोन जागांवर असलेल्या काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया आपल्या परंपरागत गुना मतदार संघातून पराभूत झाल्याने काँग्रेस पक्षाच्या पायाखालची जमीन सरकली आहे.भोपाळमधून ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना भाजपच्या प्रज्ञा सिंग यांनी पराभवाची धूळ चारली तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुन सिंग यांचे चिरंजीव अजय सिंग राहुल यांनाही मतदारांनी नाकारले. अनेक दिग्गजांचा पराभव करीत भाजप उमेदवारांनी २८ जागांवर आघाडी घेतली. ‘मामा भूल हो गई’, असे आता मतदार बोलू लागल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी व्यक्त केली आहे.अवघ्या चार महिन्यातच मतदारांना काँग्रेसचा खरा चेहरा दिसून आला आणि त्याचे उत्तर मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून दिल्याचेही शिवराज सिंग सांगतात. मध्य प्रदेशात छिंदवाडा मतदारसंघातून मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ यांचा अपवाद वगळता काँग्रेसच्या हाती काहीच लागले नाही.निकालाची कारणेविधानसभा निवडणुकीत भाजपवर नाराज असलेल्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मोदींनाच पहिली पसंती दिलीमाजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कार्यपद्धतीची तुलना होऊ लागली आहे.विधानसभेतील यशानंतर पक्षसंघटनेकडे काँग्रेसच्या एकाही नेत्याने लक्ष दिले नाही. काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आली नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019