शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

मानवतेला काळीमा फासणारी घटना; वृद्धला बाइकला बांधून फरफटत नेले, प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 18:09 IST

रस्त्यावर फरफटल्यामुळे शरीरावरील त्वचा सोलली जाऊन गंभीर जखमा झाल्या.

MP Crime: मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तीन तरुणांनी एका वृद्धावर अत्यंत अमानुषपणे हल्ला करून त्यांना मारहाण केली, शिवाय बाइकला बांधून रस्त्यावरून अनेक किलोमीटर फरफटत नेले. रक्तबंबाळ अवस्थेत असलेले वृद्ध सध्या रुग्णालयात जीवन-मरणाची झुंज देत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रस्ता रोखून धरल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

काय आहे संपूर्ण घटना?

रीवा जिल्ह्यातील समेरिया पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे लक्ष्मण प्रजापती हे या क्रूर घटनेचे बळी ठरले. पोलिसांच्या माहितीनुसार, किरकोळ वादातून बाइकवरून आलेल्या तीन तरुणांनी लक्ष्मण यांना अडवले. आधी त्यांना निर्दयपणे मारहाण केली आणि नंतर बाईकला बांधून रस्त्यावरून फरफटत नेले.

शरीर अक्षरशः सोलले गेले; प्रकृती गंभीर

रस्त्यावर फरफटल्यामुळे शरीरावरील त्वचा सोलली जाऊन मांस बाहेर येईल इतक्या गंभीर जखमा झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रीव्यातील संजय गांधी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले आहे.

संतप्त नागरिकांचा चक्काजाम

या अमानुषतेच्या निषेधार्थ नातेवाईक आणि ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. त्यांनी सेमरिया-रीवा मार्गावर अनेक तास चक्काजाम केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बरीच मेहनत घेऊन मार्ग मोकळा केला.

आरोपींची ओळख पटली; अटकेसाठी पथके रवाना

पोलिसांनी सांगितले की, आरोपींची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपी ताब्यात घेतले जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Horrific act: Elderly man dragged by bike; condition critical.

Web Summary : In Rewa, Madhya Pradesh, three youths brutally assaulted an elderly man and dragged him behind a bike. The severely injured victim is fighting for his life. Protests erupted, and police are searching for the identified suspects.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी