शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

फक्त 'या' वयातील महिलांवरच मोदींचा प्रभाव, जीन्स-मोबाइल वापरणाऱ्या मुलींबद्दल दिग्विजय सिंहांचं अजब विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 16:53 IST

Digvijaya Singh commented on PM Narendra Modi : या व्हिडिओत, कोणत्या वयाच्या महिलांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव आहे आणि कोणते कपडे घालणाऱ्या मुलींवर पंतप्रधान मोदींचा प्रभाव नाही, हे दिग्विजय सिंह सांगत आहेत.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. जीन्स घालणाऱ्या आणि मोबाईल वापरणाऱ्या मुलींवर नाही तर 40-50 वर्षांच्या महिलांवरच पीएम मोदींचा (PM Narendra Modi) प्रभाव आहे, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. दिग्विजय सिंहांच्या या वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भोपाळमध्ये जन-जागरण शिबिराला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जाते. (Digvijaya Singh on PM Narendra Modi and jeans mobiles women) 

या व्हिडिओत, कोणत्या वयाच्या महिलांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव आहे आणि कोणते कपडे घालणाऱ्या मुलींवर पंतप्रधान मोदींचा प्रभाव नाही, हे दिग्विजय सिंह सांगत आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिग्विजय सिंह म्हणत आहेत की, प्रियंका गांधी यांनी एक अतिशय मजेशीर गोष्ट सांगितली होती, जी यापूर्वी आपल्या कधीच लक्षात आली नाही. त्या (प्रियांका गांधी) म्हणाल्या होत्या, की 40 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांवर मोदींचा थोडा अधिक प्रभाव आहे. पण जीन्स घालणाऱ्या आणि मोबाईल वापरणाऱ्या मुलींवर त्यांचा प्रभाव नाही. यावर चर्चा होणे आवश्यक आहे. मोबाईलवर अॅक्टिव्ह असणाऱ्या मुली सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असतात, यामुळे अशा आपण अशा लोकांशी संपर्क वाढवायला हवा.

दिग्विजय सिंहांचे मानसिक संतुलन बिघडले आहे - भाजप आमदार दिग्विजय सिंह यांच्या पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर, भाजपतूनही प्रतिक्रिया आली आहे. आमदार रामेश्वर शर्मा म्हणाले, दिग्विजय यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. स्त्रियांबद्दलचा त्यांचा हा विचार अत्यंत खालच्या पातळीचा आहे. दिग्विजय सिंह सध्या वेडेपणाच्या फेजमधून जात आहेत. मी सोनिया गांधींना विचारतो की, अशा व्यक्तीला पक्षात ठेवलेच कशासाठी? याच दिग्विजय सिंहांनी काँग्रेस खासदार असलेल्या मीनाक्षी नटराजन यांच्याबद्दलही अपशब्द वापरले होते. महिला पूजनीय आणि वंदनीय आहेत, त्यांच्या नावावर राजकारण करणे शोभत नाही.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसWomenमहिलाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी