शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Digvijaya Singh: जातीय हिंसाचारानंतर राजकारण तापले; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यावर अटकेची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 13:25 IST

Bhopal News: रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशात मोठा हिंसाचार झाला होता, त्याप्रकरणी वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे माजी मुख्यमंत्र्यावर 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भोपाळ:मध्य प्रदेशात रामनवमीला झालेला हिंसाचार थंडावला असला तरी राज्यातील राजकारण मात्र तापले आहे. राज्यातील जातीय हिंसाचारावरून काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह(Digvijaya Singh) आणि शिवराज सरकार आमने-सामने आले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या एका कथित वादग्रस्त ट्विटबद्दल आतापर्यंत 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे.

रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये झालेल्या हिंसाचारावर ट्विट केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात होशंगाबादमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, ट्विट केलेला फोटो चुकीचा असेल तर मी तो काढून टाकला आहे. भाजप माझ्या विरोधात अजेंडा राबवत आहे. माझ्यावर एक लाख एफआयआर नोंदवा, मी घाबरत नाही, असे ते म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे?रामनवमीला झालेल्या हिंसाचारानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक फोटो शेअर केला होता. त्याला खरगोनमध्ये उसळलेल्या हिंसाचाराबद्दल सांगण्यात आले होते, परंतु नंतर तो काढून टाकण्यात आला. त्यावर भाजपने दिग्विजय सिंह यांच्यावर जाणीवपूर्वक जातीय हिंसा भडकावल्याचा आरोप केला. तसेच, मध्य प्रदेश सरकारने दिग्विजय सिंह यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याची मागणीही केली.

भाजप नेते काय म्हणाले?मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा यांनी दिग्विजय सिंह यांना आता अटक करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ते वाचणार नाहीत, त्यांनी मोठा गुन्हा केला आहे, असे ते म्हणाले. हिंसाचारातील सामील असणाऱ्यांवर बुलडोझरने कारवाई केली जात असून, कोणत्याही दोषीला सोडले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश