शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

कमलनाथ यांचा यू टर्न; आता वाजत गाजत म्हटलं जाणार वंदे मातरम्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 3:17 PM

'वंदे मातरम्'ला आकर्षक स्वरुप देण्याचा सरकारचा प्रयत्न

भोपाळ: राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांना वंदे मातरम् म्हणण्यास मनाई करणाऱ्या मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारनं यू टर्न घेतला आहे. उलट सरकारनं 'वंदे मातरम्'ला अधिक आकर्षक स्वरुप देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच सामान्य जनतादेखील वंदे मातरम् गायनात सहभागी होऊ शकेल. याशिवाय पोलीस बँडसोबत राष्ट्रगीत म्हटलं जाईल. मध्य प्रदेशच्या सचिवालयात गेल्या अनेक वर्षांपासून वंदे मातरम् गायलं जातं. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रगीत म्हटलं जायचं. मात्र काँग्रेस सत्तेत आल्यानंतर ही परंपरा खंडित झाली. 1 जानेवारीला वंदे मातरम् गाण्यात आलं नाही. त्यामुळे विरोधी पक्षात असलेल्या भाजपानं सरकारवर निशाणा साधला. 'काँग्रेसला राष्ट्रगीताची शब्द रचना माहीत नसेल किंवा राष्ट्रगीत म्हणण्यात लाज वाटत असेल, तर त्यांना मला तसं सांगावं. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मी वल्लभ भवनाच्या प्रांगणात सर्वसामान्य जनतेसोबत वंदे मातरम् म्हणेन,' अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर शरसंधान साधलं होतं. भाजपानं जोरदार विरोध केल्यानंतर कमलनाथ सरकारनं घूमजाव केलं. आता प्रत्येक महिन्याच्या कार्यालयीन कामाच्या पहिल्या दिवशी सकाळी पावणे अकरा वाजता पोलीस बँड भोपाळमधील शौर्य स्मारक ते वल्लभ भवनपर्यंत मार्च करेल. यानंतर वल्लभ भवनजवळ वंदे मातरम् आणि राष्ट्रगीत म्हटलं जाईल. यामध्ये सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि सर्वसामान्य जनतादेखील सहभागी होईल. दर महिन्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी वंदे मातरम् गाण्याची परंपरा 2005 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांनी सुरू केली होती.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसNational Anthemराष्ट्रगीतVande Mataramवंदे मातरम