शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

CoronaVirus: भाजप तयार करतेय जम्बो आयसोलेशन सेंटर, मिळणार मोफत उपचार; दाखवलं जाणार रामायण अन् बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 19:13 IST

ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असेल, त्यांना तो या सेंटरमध्ये उपलब्ध करून दिला जाईल आणि तत्काळ रुग्णालयांतही पाठविले जाईल. येथे नर्सिंग स्टाफ शिवाय डॉक्टरदेखील 24 तास उपलब्ध राहतील. ही संपूर्ण व्यवस्था निःशुल्क असेल.

भोपाळ - सध्या संपूर्ण देशा कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सेवा हतबल झाल्याचे चीत्र बघायला मिळत आहे. कोरोनामुळे मध्यप्रदेशची स्थितीही गंभीर आहे. राज्यात सीएम शिवराज सिंह चौहानही संपूर्ण प्रशासनासह कंबर कसून कोरोना महामारीचा सामना करताना दिसत आहेत. आता त्यांच्या पक्षानेही या संकट काळात कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन सेंटर तयार करण्याचे काम सुरू केले आहे. भाजपकडून  भोपाळमधील लाल परेड मैदानातील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये एक हजार बेडचे क्वारंटाइन सेंटर तयार केले जात आहे.

ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असेल, त्यांना तो या सेंटरमध्ये उपलब्ध करून दिला जाईल आणि तत्काळ रुग्णालयांतही पाठविले जाईल. येथे नर्सिंग स्टाफ शिवाय डॉक्टरदेखील 24 तास उपलब्ध राहतील. ही संपूर्ण व्यवस्था निःशुल्क असेल. भाजपच्या काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे रुग्णांना दिवसभर, महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र आणि भजन ऐकायला मिळेल. यामुळे येथील वातावरण सकारात्मक होईल आणि रुग्णांचे मनोरंजनही होईल. एवढेच नाही, तर येथे रोज सकाळी आणि सायंकाळी रामायण मालिकाही दाखवण्यात येईल. इंडिया टीव्हीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.

CoronaVirus : आता 'या' राज्यात कोरोना रुग्णांना मोफत मिळणार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, सरकारचा मोठा निर्णय

काही संबंधितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे लोकांना सुरुवातीच्या उपचारांसह सकारात्मक वातावरणही दिले जाईल. ज्या लोकांना कोरोनाची सुरुवातीची लक्षणे दिसत आहेत आणि घरात आयसोलेट होण्यासाठी जागा नाही, अशा लोकांनाच येथे दाखल करून घेतले जाईल. येथे येणाऱ्या लोकांना केवळ उपचारच नाही, तर दोन वेळचे जेवण आणि चहा-नाश्ताही दिला जाणार आहे.

या दहा राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर -केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशामध्ये एका दिवसात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह १० राज्यांमध्ये सापडले आहेत. या राज्यांमध्ये कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत २८ कोटींहून अधिक सँपलची तपासणी झाली आहे. तसेच देशातील संसर्गाचा दर हा ६.२८ टक्के एवढा आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ४८ हजार ७०० रुग्ण सापडले आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये ३३ हजार ५५१ आणि कर्नाटकमध्ये २९ हजार ७४४ रुग्णांचे निदान झाले आहे. 

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! 'या' शहरात कोरोनाचा हाहाकार; डेथ सर्टिफिकेटसाठी लागल्या भल्या मोठ्या रांगा

देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २८ लाख ८२ हजार २०४ वर -मंत्रालयाने सांगितले की, भारतामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढून २८ लाख ८२ हजार २०४ एवढी झाली आहे. तर एकूण बाधिकांची संख्या ही १६.३४ टक्के आहे. गेल्या २४ तासांमध्ये आजारी रुग्णांच्या संख्येमध्ये ६८ हजार ५४६ ने वाढ झाली आहे. देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान तामिळनाडू, गुजरात आणि केरळमध्ये आहेत. देशात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांपैकी १६.४३ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ८२.५४ टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 

CoronaVirus: बाजारात विकले जातेय बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन, सोफीनं सांगितला fake-original मधला फरक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा