मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजपा नेत्याची दगडानं ठेचून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 12:58 IST2019-01-20T12:20:34+5:302019-01-20T12:58:47+5:30

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या भाजपा नेत्याचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

Madhya Pradesh : BJP leader Manoj Thackeray has been found dead | मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजपा नेत्याची दगडानं ठेचून निर्घृण हत्या

मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजपा नेत्याची दगडानं ठेचून निर्घृण हत्या

ठळक मुद्देभाजपा नेते मनोज ठाकरे यांची हत्यामनोज ठाकरे यांचे डोके दगडाने ठेचले

भोपाळ - मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे एका भाजपा नेत्याचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव मनोज ठाकरे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज ठाकरे रविवारी (20 जानेवारी) मॉर्निंग वॉकला गेले होते. यादरम्यान, पोलीस स्टेशन परिसरात त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचे डोके दगडानं ठेचण्यात आले होते. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. सध्या पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत. मनोज ठाकरे यांची हत्या कोणत्या कारणांसाठी करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंदसौर शहरात अज्ञात व्यक्तीनं स्थानिक नगर पालिका अध्यक्ष प्रल्हाद बंधवार यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. 



 



 



 




Web Title: Madhya Pradesh : BJP leader Manoj Thackeray has been found dead