मध्य प्रदेशात बस नदीत कोसळून 6 जणांना जलसमाधी, 19 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 09:46 IST2019-10-03T09:46:31+5:302019-10-03T09:46:37+5:30

या बसमध्ये जवळपास 45 प्रवासी होते

Madhya Pradesh: 6 people killed, 19 injured after a bus fell into a river in Raisen, last night; injured being treated at a local hospital | मध्य प्रदेशात बस नदीत कोसळून 6 जणांना जलसमाधी, 19 जखमी

मध्य प्रदेशात बस नदीत कोसळून 6 जणांना जलसमाधी, 19 जखमी

रायसेन: मध्य प्रदेशातील रायसेनमध्ये एक बस पुलावरून नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस पुलाचा कठडा तोडून रीछन नदीत कोसळली. ही बस इंदोरहून छतरपूरला जात होती. या बसमध्ये जवळपास 45 प्रवासी होते. या घटनेची माहिती मिळताच येथील स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले. 

घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले आहे. या अपघातात जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे आले. तसेच, बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा शोध सुरु आहे.  

Web Title: Madhya Pradesh: 6 people killed, 19 injured after a bus fell into a river in Raisen, last night; injured being treated at a local hospital