हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या माधुरी गुप्ता यांना तीन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:37 AM2018-05-20T00:37:15+5:302018-05-20T00:37:15+5:30

अतिमहत्त्वाकांक्षा नडली : आयएआय देत होत्या माहिती, गुप्तहेराच्या प्रेमात अडकल्या

Madhuri Gupta gets three years' education in Honey Trap | हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या माधुरी गुप्ता यांना तीन वर्षांची शिक्षा

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या माधुरी गुप्ता यांना तीन वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली : हनी ट्रॅपमध्ये आतापर्यंत परराष्ट्र खात्यातील तसेच संरक्षण दलातील काही अधिकारी अडकल्याचे सर्वांना माहीत आहे. पण अशा हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या माधुरी गुप्ता या पहिल्या महिला अधिकारी असून, त्यांना दिल्लीतील न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर शनिवारी तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
माधुरी गुप्ता परराष्ट्र सेवेमध्ये असताना पाकिस्तानच्या भारतीय दूतावासामध्ये बसून पाकसाठी काम करीत होत्या, असे उघडकीस आले आहे. पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या एका अधिकाऱ्याच्या प्रेमात अडकलेल्या माधुरी गुप्ता यांनी बरीच गोपनीय माहिती त्याला पुरवली. ही बाब भारतीय गुप्तचर यंत्रणांना लक्षात येताच, गुप्ता यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्यात त्या खरोखरच पाकिस्तानला मदत करीत असल्याचे सिद्ध होताच, त्याला दिल्लीला बोलावून अटक केली.
माधुरी गुप्ता १९८३म्साली परराष्ट्र सेवेत रुजू झाल्या, तेव्हा त्यांची पहिली नेमणूक क्वालालंपूर येथे झाली. त्यानंतर त्या बगदादमध्ये होत्या. अतिमहत्त्वाकांक्षी असलेल्या माधुरी गुप्ता यांनी सतत पुढे जाण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांना भुरळ पाडायला सुरुवात केली. मॉस्कोमधील एका भारतीय अधिकाºयाने गुप्ता यांना मॉस्को दूतावासात आणण्यासाठी लॉबिंग केले. पण त्यात यश आले नाही.
बगदादमध्ये असताना माधुरी गुप्तांनी एका शीख तरुणाला प्रभावित केले आणि त्याच्या संयुक्त राष्ट्रांतील संपर्काचा फायदा उठवला. तिथे असताना एका विवाहीत अधिकाºयाला त्यांनी भुरळ घातली. पण त्या अधिकाºयाच्या पत्नीला ही बाब लक्षात येताच तिने त्याच्या तक्रारी केल्या. त्यानंतर त्यांना दिल्लीत आणले गेले. पण तिथे येताच इस्लामाबादमध्ये नियुक्ती मिळवली. उर्दूवरील प्रभुत्वामुळे त्यांची सहजच नेमणूक झाली. इस्लामाबादच्या भारतीय दुतावासातील नेमणूक अतिशय संवेदनशील होती. तेथील भारतीय अधिकाºयांवर आयएसआय सतत लक्ष ठेवून असते. सतत धोका असल्याने भारतीय अधिकाºयांना बुलेटप्रुफ वाहनांतूनच प्रवास करावा लागतो. तरीही माधुरी गुप्ता यांनी तिथे स्वत:चा मित्रपरिवार जमा केला. त्यांच्या या वागण्यामुळे वरिष्ठ नाराज होते. त्या पदोन्नतीने आयएफएस अधिकारी झाल्या असल्याची खंतही त्यांच्या मनात होती. ही खंत आयएसआयच्या राणा नावाच्या अधिकाºयाने ओळखली आणि जाणीवपूर्वक गुप्तांशी मैत्री केली. त्याही राणा यांच्या जाळ्यात अडकत गेल्या.

‘रॉ’ ने ठेवली होती पाळत
जवळीक खूप वाढल्यांतर आपला मोबाइल व घरातील कम्प्युटर यांद्वारे काही माहिती त्या अधिकाºयापर्यंत पोहोचवायला माधुरी यांनी सुरुवात केली. कोणाला कळणार नाही, याप्रकारे माहितीची देवाणघेवाण कशी करायची, हे त्या अधिकाºयाने त्यांना शिकवले. मात्र नियुक्तीनंतर सहा महिन्यांतच भारताच्या रॉ या गुप्तचर संघटनेला त्यांच्याविषयी संशय आला.

भूतानमध्ये बोलावून घेतले ताब्यात
त्यानंतर माधुरी गुप्तांना मुद्दामच एक माहिती देण्यात आली जी नंतर पाकिस्तानपर्यंत पोहचली होती. पण त्यांच्यावर घाईघाईने कारवाई करणे शक्य नसल्याने त्यांना ठरवून भूतानमधील सार्क संमेलनात माध्यमांशी समन्वय साधण्यासाठी निवडण्यात आले. नंतर तिथे पोहाचताच, त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात दिल्ली न्यायालयात खटला चालला आणि अटकेनंतर आठ वर्षांनी माधुरी शनिवारी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

Web Title: Madhuri Gupta gets three years' education in Honey Trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.