म. फुले भारतरत्न

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:12+5:302015-03-20T22:40:12+5:30

सावित्रीबाई व जोतिबांना भारतरत्न द्या !

M Phule Bharat Ratna | म. फुले भारतरत्न

म. फुले भारतरत्न

वित्रीबाई व जोतिबांना भारतरत्न द्या !
सातव यांची मागणी : उत्स्फूर्त सर्वपक्षीय पाठिंबा
नवी दिल्ली : देशात स्त्री शिक्षणाची गुढी उभारणार्‍या सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी खा. राजीव सातव यांनी शुक्रवारी लोकसभेत केली आणि संपूर्ण सभागृहाने एकमताने ही मागणी टाळ्यांच्या कडकडाटात उचलून धरली. सातव हा विषय मांडत होते, तेव्हा सभागृहात मागणीच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय सदस्यांनी बाके वाजविली.
लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी शून्य प्रहर घेण्यात आला. त्यावेळी सातव यांनी ही मागणी केली. लोकसभेत हा विषय पहिल्यांदाच मांडण्यात आला. सातव म्हणाले, देशात स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेणार्‍या सावित्रीबाई फुले व हे कार्य पुढे चालावे म्हणून त्यांना सतत प्रोत्साहन देणारे जोतिबा फुले यांना भारतरत्नाने सन्मानित करणे, आपल्या सार्‍यांचे कर्तव्य आहे. ते थोर समाजसुधारक होते. या विषयावर काँग्रेस,भाजपासह अन्य पक्षाच्या सदस्यांनी अनुमोदन दिले. जोरदार टाळ्यांनी विषयाला सहयोगही दिला. (विशेष प्रतिनिधी)
----------------------

Web Title: M Phule Bharat Ratna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.